Join us  

नोकरी बदललीये? त्वरित पूर्ण करा PF शी निगडीत हे काम, अन्यथा येऊ शकते समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 10:13 AM

भविष्य निर्वाह निधी हा कर्मचारी वर्गाचं सेव्हिंगचं एक माध्यम आहे. त्यांच्या वेतनातून ठराविक रक्कम दर महिन्याला यात जमा होत असते.

भविष्य निर्वाह निधी हा कर्मचारी वर्गाचं पैसे साठवण्याचं एक माध्यम आहे. त्यांच्या वेतनातून ठराविक रक्कम दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीत जमा होत असते. अनेकदा आपण आपल्या करिअरमधील ग्रोथ साठी नोकरी बदलत असतो. करोना महासाथीनंतर यात मोठी वाढही दिसून आली. अशातच जर तुम्हीही नोकरी बदलली असेल आणि नव्या कंपनीत रुजू झाला असाल तर महत्त्वाचं काम पहिले पूर्ण करून घ्या. तुमचं ईपीएफ खातं मर्ज करण्याचं महत्त्वाचं काम पूर्ण करणं आवश्यक आहे.

प्रत्येक नव्या कंपनीत तुमच्या जुन्याच युएएन नंबरद्वारे नवं पीएफ खातं सुरू केलं जातं. परंतु पीएफ अकाऊंटमध्ये जुन्या कंपनीद्वारे जमा केलेला फंड मात्र त्यात येत नाही. यासाठी पीएफ अकाऊंट होल्डरला ईपीएफओच्या वेबसाईटवर जाऊन फंड मर्ज करावा लागतो.

ऑनलाइन सुविधाईपीएफओ अकाऊंट मर्ज केल्यानंतर संपूर्ण रक्कम एकाच अकाऊंटमध्ये दिसेल. तुम्ही सहजरित्या तुमचा अकाऊंट मर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या साईटवर जावं लागेल. त्या ठिकाणी सर्व्हिसेसवर क्लिक करा. त्यानंतर One Employee One EPF Account वर क्लिक करा.

रजिस्टर्ड नंबरवर येणार ओटीपीयानंतर तुमचा अकाऊंट मर्ज करण्यासाठी एक फॉर्म उघडेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर युएएन आणि करंट मेंबर आयडी टाका. संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर Authentication साठी एक ओटीपी जनरेट होईल. तो तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल.

जसा तुम्ही मोबाइलवर आलेला ओटीपी टाकाल, तुमची जुनी अकाऊंट डिटेल्स तुम्हाला दिसतील. त्यानंतर पीएफ अकाऊंट नंबर टाका आणि सबमिट करा. तुमची मर्ज अकाऊंट रिक्वेस्ट मान्य केली जाईल. नंतप व्हेरिफिकेशननंतर काहि दिवसांनी तुमचा अकाऊंट मर्ज होईल.

युएएन आवश्यकईपीएफशी निगडीत कोणत्याही सुविधेचा ऑनलाइन लाभ घेण्यासाठी युएएन माहित असणं आवश्यक आहे. याशिवाय तुमचा युएएन अॅक्टिव्हेट असणंही महत्त्वाचं आहे.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीऑनलाइननोकरी