Join us  

PPF, Post Office आणि RD वर किती मिळतंय व्याज, फटाफट करा चेक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 11:29 AM

निश्चित उत्पन्न मिळणाऱ्या गुंतवणुकीचे पर्याय शोधत असलेल्या लोकांसाठी स्मॉल सेव्हिंग स्कीम हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Small Saving Scheme Interest Rate: निश्चित उत्पन्न मिळणाऱ्या गुंतवणुकीचे पर्याय शोधत असलेल्या लोकांसाठी स्मॉल सेव्हिंग स्कीम (Small Saving Scheme) हा सर्वोत्तम पर्याय आहे. या योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम यांचा समावेश आहे. या सर्व बचत योजना सरकार चालवत असून यावर हमखास रिटर्न मिळतात.स्मॉल सेव्हिंग स्कीम म्हणजे काय?स्मॉल सेव्हिंग स्कीम्स नागरिकांना नियमित बचत करण्यास मदत करतात. या योजना तीन प्रकारच्या आहेत. बचत योजना, सामाजिक सुरक्षा योजना आणि मासिक उत्पन्न योजना. बचत योजनांमध्ये १ ते ३ वर्षांची ठेव योजना, ५ वर्षांची आर.डी. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि किसान विकास पत्र (KVP) सारखी बचत प्रमाणपत्रे देखील समाविष्ट आहेत. सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांचा समावेश होतो.किती आहे व्याजदर?

  • बचत खातं – ४ टक्के
  • १ वर्ष पोस्ट ऑफिस एफडी - ६.९ टक्के
  • २ वर्षाची पोस्ट ऑफिस एफडी - ७ टक्के
  • ३ वर्षांची पोस्ट ऑफिस एफडी – ७ टक्के
  • ५ वर्ष पोस्ट ऑफिस एफडी - 7.5 टक्के
  • ५ वर्षे आरडी - ६.७० टक्के
  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) - ७.७ टक्के
  • किसान विकास पत्र - ७.५ टक्के (११५ महिन्यांत मॅच्युअर होणार)
  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी - ७.१ टक्के
  • सुकन्या समृद्धी खाते (Sukanya Samridhi Yojna) - ८ टक्के
  • ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme) - ८.२ टक्के
  • मासिक उत्पन्न योजना - ७.४ टक्के
टॅग्स :गुंतवणूकपोस्ट ऑफिसपैसा