Children's Day 2024: भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त आज देशभरात बालदिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं आपल्या मुलांसाठी काही खास करायचं असेल तर तुम्ही एलआयसीच्या चिल्ड्रन स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. एलआयसीच्या मुलांसाठी अशा अनेक योजना आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करून आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करू शकता.
एलआयसी जीवन तरुण पॉलिसी
एलआयसी जीवन तरुण पॉलिसी ही मुलांसाठी अतिशय फायदेशीर पॉलिसी आहे. त्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलांचं भवितव्य सुरक्षित करू शकता. ही पॉलिसी नॉन-लिंक्ड लिमिटेड प्रीमियम पेमेंट प्लॅन आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या मुलांचं वय ९० दिवस ते १३ वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. मूल २० वर्षांचे होईपर्यंत तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करावी लागते. त्याचबरोबर मूल २५ वर्षांचं झाल्यावर पॉलिसी मॅच्युअर होईल. यामध्ये तुम्ही ७५,००० रुपयांपासून विमा योजना खरेदी करू शकता.
LIC न्यू चिल्ड्रेन मनी बॅक प्लॅन
एलआयसीची ही पॉलिसी नॉन लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, इंडिव्हिज्युअल, लाइफ इन्शुरन्स मनी बॅक स्कीम आहे. या स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी निधी जमा करू शकता. एलआयसीच्या या योजनेत तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत कधीही गुंतवणूक करू शकता.
गुंतवलेले पैसे मूल १८, २०, २२ आणि २५ वर्षांचे असताना चार वेळा मिळतात. वयाच्या १८, २० आणि २२ व्या वर्षी २०-२० टक्के रक्कम दिली जाते. तर वयाच्या २५ व्या वर्षी ४० टक्के रक्कम दिली जाते.
LIC अमृत बाल प्लान
एलआयसी अमृत बाल प्लान ही मुलांसाठी एलआयसीची सर्वात लोकप्रिय पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करू शकता. या पॉलिसीमध्ये मिळणारा परतावाही खूप चांगला आहे. ही नॉन लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी आहे. यात गुंतवणूक करण्यासाठी मुलांचे वय ३० दिवस ते १३ वर्षांपर्यंत असावं लागतं. तर, या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २५ वर्षांचा आहे. या पॉलिसीची किमान विमा रक्कम २,००,०००० रुपये आहे.