Join us  

देशातील सर्वात मोठी IT कंपनी TCS ला झटका; अमेरिकन कोर्टाने ठोठावला 1620 कोटींचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 10:00 PM

स्वतः टीसीएसने याबाबत माहिती दिली आहे.

TCS News : देशातील आघाडीची IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(TCS) बाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने कंपनीला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अमेरिकन आयटी सेवा फर्म DXC (पूर्वीचे CSC) च्या ट्रेड सिक्रेटचा गैरवापर केल्याबद्दल अमेरिकन कोर्टाने TCS वर 194 मिलियन डॉलर्स, म्हणजेच 1620 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. स्वतः कंपनीने ही माहिती दिली आहे. 

TCS ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीवर लावण्यात आलेला दंड $194.2 मिलियन जास्त आहे. यामध्ये $561.5 मिलियन कम्पनसेटरी डॅमेज, $112.3 मिलियन एक्झेम्पलरी डॅमेज आणि $25.8 मिलियन प्रीजजमेंट इंटरेस्टचा समावेश आहे. भारतीय चलनात दंडाची एकूण रक्कम अंदाजे 1,622 कोटी रुपये आहे.

दंड का ठोठावला?2018 मध्ये TCS ला US विमा कंपनी Transamerica कडून $2.5 अब्ज किमतीचे काम मिळाले होते. या करारानुसार ट्रान्सअमेरिकाच्या 10 मिलियन ग्राहकांना एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सुविधा पुरवल्या जाणार होत्या. पण, गेल्या वर्षी जूनमध्ये हा करार रद्द करण्यात आला. दरम्यान, आता कंपनी न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणार आहे. 

टॅग्स :टाटान्यायालयअमेरिकाव्यवसायगुंतवणूक