Join us

पोस्टाच्या या स्कीममध्ये १० वर्षांसाठी जमा करा ५ लाख, मिळतील १०,५१,१७५; दुपटीपेक्षा अधिक नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 1:32 PM

जर तुम्ही गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय शोधत असाल तर तुम्ही यात गुंतवणूक करू शकता.

Post Office FD SCheme : जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि चांगला नफा मिळेल, असा पर्याय तुम्ही शोधत असाल तर, यासाठी एफडी (FD) हा नेहमीच चांगला पर्याय राहिला आहे. एफडी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. हा पर्याय तुम्हाला सर्वच बँकांमध्ये मिळेल. पण तुम्हाला हवं तर यावेळी तुम्ही बँकेऐवजी पोस्ट ऑफिसच्या एफडी (Post Office FD) स्कीम ट्राय करू शकता.

पोस्ट ऑफिस एफडीला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट  (Post Office Time Deposit) म्हणतात. तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये १, २, ३ आणि ५ वर्षांसाठी एफडीचा पर्याय मिळतो. तुम्ही यामध्ये १० वर्षांसाठी पैसे जमा केल्यास, तुम्ही तुमची रक्कम दुप्पट होऊ शकते. सध्या ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के दरानं व्याज मिळत आहे.कसे होतील पैसे दुप्पट?सध्या पोस्ट ऑफिस एफडीवर ७.५ टक्के दरानं व्याज मिळतं. समजा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ५ लाख रुपये जमा केले तर ७.५ टक्के दरानं तुम्हाला त्यावर २,२४,९७४ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, ५ वर्षांत तुमची रक्कम ७,२४,९७४ रुपये होईल. आता तुम्ही ती आणखी ५ वर्षांसाठी पुन्हा जमा केल्यास, मॅच्युरिटीनंतर तुम्हाला १०,५१,१७५ रुपये मिळतील. ही रक्कम दुपटीपेक्षाही अधिक आहे.किती आहे व्याज?१ वर्षासाठी ६.९ टक्के व्याज दिलं जातं.२ वर्षांसाठी ७ टक्के व्याज दिलं जातं.३ वर्षासाठी ७ टक्के व्याज दिलं जातं.५ वर्षासाठी ७.५ टक्के व्याज दिलं जातं.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक