Lokmat Money >गुंतवणूक > Atal Pension Yojana मध्ये महिन्याला जमा करा ४२ रुपये, आयुष्यभर मिळेल १२००० रुपये Pension

Atal Pension Yojana मध्ये महिन्याला जमा करा ४२ रुपये, आयुष्यभर मिळेल १२००० रुपये Pension

पाहा तुम्ही या योजनेत किती रुपयांची गुंतवणूक करुन पेन्शन मिळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 11:04 AM2024-01-19T11:04:19+5:302024-01-19T11:04:39+5:30

पाहा तुम्ही या योजनेत किती रुपयांची गुंतवणूक करुन पेन्शन मिळवू शकता.

Deposit Rs 42 per month in Atal Pension Yojana get Rs 12000 pension for lifetime 1000 rs monthly pension know details | Atal Pension Yojana मध्ये महिन्याला जमा करा ४२ रुपये, आयुष्यभर मिळेल १२००० रुपये Pension

Atal Pension Yojana मध्ये महिन्याला जमा करा ४२ रुपये, आयुष्यभर मिळेल १२००० रुपये Pension

सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाबाबतची चिंता तुम्हालाही सतावतेय का? तुम्ही देखील असंघटित क्षेत्रातील आहात आणि अद्याप कोणत्याही पेन्शन योजनेत गुंतवणूक केलेली नसेल तर आज येथे आम्ही तुम्हाला सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या योजनेबद्दल सांगत आहोत. यामध्ये दरमहा सुमारे २०० रुपये गुंतवून तुम्हाला आयुष्यभर ५००० रुपये पेन्शन मिळू शकतं. अटल पेन्शन या सरकारी योजनेद्वारे तुम्हाला वार्षिक ६०,००० रुपये पेन्शन मिळेल.

केवळ २१० रुपये करा जमा

दरमहा फक्त २१० रुपये जमा करून, तुम्हाला निवृत्तीनंतर म्हणजेच ६० वर्षांनंतर दरमहा ५ हजार रुपये कमाल पेन्शन मिळू शकते. या सरकारी योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना. यामध्ये दरमहा हमी पेन्शन दिली जाते. सध्याच्या नियमांनुसार, १८ वर्ष वय असताना या योजनेशी जोडले गेल्यास  जास्तीत जास्त 5,000 रुपये पेन्शनसाठी तुम्हाला दरमहा २१० रुपये द्यावे लागतील. तुम्ही दर तीन महिन्यांनी रक्कम भरल्यास तुम्हाला ६२६ रुपये द्यावे लागतील आणि दर सहा महिन्यांनी भरल्यास तुम्हाला १,२३९ रुपये द्यावे लागतील. दरमहा १००० रुपये पेन्शन मिळवण्यासाठी, तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला दरमहा ४२ रुपये द्यावे लागतील.

काय आहे अटल पेन्शन योजना?

वृद्धापकाळातील उत्पन्नाची सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारनं २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजना आणली आहे. या योजनेद्वारे सरकार सामान्य लोकांना, विशेषत: असंघटित क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना शक्य तितकी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. असंघटित क्षेत्राशी निगडित लोकांना निवृत्तीनंतर उत्पन्न नसण्याच्या जोखमीपासून आपलं आणि कुटुंबीयांचं संरक्षण करावं लागतं. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे (PFRDA) चालवली जाते.

महिन्याला ५००० पेन्शन

अटल पेन्शन योजनेअंतर्गत, ग्राहकांना दरमहा १००० ते ५००० रुपये पेन्शन मिळते. भारत सरकार किमान पेन्शन लाभाची हमी देते. केंद्र सरकार ग्राहकांच्या योगदानाच्या ५० टक्के किंवा वार्षिक १००० रुपये, यापैकी जे कमी असेल ते योगदान देते. सरकारी योगदान अशा लोकांना दिलं जातं जे कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजनेत समाविष्ट नाहीत आणि करदातेही नाहीत. योजनेअंतर्गत १०००, २०००, ३०००, ४००० आणि ५००० रुपये पेन्शन उपलब्ध आहे. पेन्शनच्या रकमेवरही गुंतवणूक अवलंबून असते. तुम्ही लहान वयात यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्यास तुम्हाला अधिक फायदे मिळतात.

Web Title: Deposit Rs 42 per month in Atal Pension Yojana get Rs 12000 pension for lifetime 1000 rs monthly pension know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.