Join us

सरकारी कंपन्यांचा लाभांश बचत याेजनांवर भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2023 9:35 AM

शेअर बाजारामध्ये गेल्या वर्षभरात माेठ्या प्रमाणात उतार-चढाव बघायला मिळाला.

नवी दिल्ली : शेअर बाजारामध्ये गेल्या वर्षभरात माेठ्या प्रमाणात उतार-चढाव बघायला मिळाला. काही महिन्यांपूर्वी बाजाराने उच्चांकी झेप घेतली हाेती. मात्र, त्यानंतर माेठी घसरण झाली. पुन्हा बाजार सावरलेला दिसताे. तरीही अस्थिरता कायम आहेच. अशा वातावरणात अनेक गुंतवणूकदारांचे नुकसानही झाले आहे. त्यात एक जमेची बाजू म्हणजे, अनेक सरकारी कंपन्यांचे गेल्या आर्थिक वर्षातील कामगिरी चांगली झाली आहे. त्यामुळे या कंपन्यांनी भरघाेस लाभांश जाहीर केला आहे. 

बँक एफडी किंवा इतर बचत याेजनांवरील व्याजापेक्षा जास्त लाभांश दिला आहे. अशा कंपन्यांमधील गुंतवणूक सुरक्षित असते. 

  •     पीपीएफ    ७.१%
  •     एससीएसएस    ८.२%
  •     सुकन्या समृद्धी    ८.०%
  •     किसान विकास पत्र    ७.५%
  •     एनएससी    ७.७%
  •     मासिक उत्पन्न याेजना    ७.४%
  •     टाईम डिपाॅझिट (१ वर्ष)    ६.८%
  •     टाईम डिपाॅझिट (१ वर्ष)    ७.५% 

या सार्वजनिक कंपन्यांनी दिला जास्त लाभांशसरकारी कंपन्यांनी यावेळी भरघाेस लाभांश जाहीर केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. सरकारी कंपन्याच नव्हे, तर अनेक खासगी कंपन्यांनीही माेठा लाभांश जाहीर केला आहे. इंडियन ऑइल, स्टील ऑथाेरिटी, आरईसी, काेल इंडिया, पीटीसी इंडिया, पाॅवर कार्पाेरेशन, एनएमडीसी यांचा यात समावेश आहे. 

लाभांश शेअर म्हणजे काय?कंपन्या शेअरधारकांना नफ्यातील काही हिस्सा लाभांशच्या स्वरूपाने देत असतात. अशा कंपन्यांना ‘डिव्हिडंड यील्ड स्टाॅक्स’ म्हणतात.    

टॅग्स :गुंतवणूकसरकारपैसा