Lokmat Money >गुंतवणूक > हीच सर्वांत योग्य वेळ; बँकेत एफडी करण्यासाठी हा मुहूर्त चुकवू नका!

हीच सर्वांत योग्य वेळ; बँकेत एफडी करण्यासाठी हा मुहूर्त चुकवू नका!

एफडीमध्ये पैसे गुंतवण्यासाठी हीच सर्वात योग्य वेळ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 08:26 AM2023-08-14T08:26:57+5:302023-08-14T08:28:17+5:30

एफडीमध्ये पैसे गुंतवण्यासाठी हीच सर्वात योग्य वेळ आहे.

do not miss this opportunity to make fd in the bank | हीच सर्वांत योग्य वेळ; बँकेत एफडी करण्यासाठी हा मुहूर्त चुकवू नका!

हीच सर्वांत योग्य वेळ; बँकेत एफडी करण्यासाठी हा मुहूर्त चुकवू नका!

लोकमत न्यूज नेटवर्क : आरबीआयची पतधोरणाची बैठक नुकतीच पार पडली. यात बँकेने रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला. त्यामुळे बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवींवर आता आणखी वाढीव व्याजदर मिळण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. काही बँकांनी तर बचत ठेवींवर दिले जाणारे व्याजदर घटविण्यास सुरुवात केली आहे. गुंतवणूकतज्ज्ञांच्या मते बँकांकडून एफडीवर दिले जाणारे व्याज सध्या सर्वोच्च शिखरावर आहे. एफडीमध्ये पैसे गुंतवण्यासाठी हीच सर्वात योग्य वेळ आहे.

कसे ठरतात एफडीचे दर?

- बँकांमधील एफडीवर दिले जाणारे व्याज रेपो रेटच्या आधारे ठरते; परंतु, रेपो रेटच्या प्रमाणात एफडीचे दर वाढवलेले नाहीत. 
- कर्जांच्या मागणीचा वाढता दर जेव्हा जमा होणाऱ्या एफडीच्या दरापेक्षा अधिक असतो तेव्हा बँका कर्जांची मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी जमविण्याच्या उद्देशाने एफडीचे दर वाढवत असतात. बँकांची तरलता कमी झाल्यासही एफडीचे दर वाढवले जातात.

असे आहे एफडीवर व्याजदर 

एसबीआय    ३ ते ७.१०%
एचडीएफसी    ३ ते ७.२५%
आयसीआयसीआय    ३ ते ७.१०%
पीएनबी    ३.५ ते ७.२५%
कोटक महिंद्रा     २.७५ ते ७.२०%
आरबीएल बँक    ३.५ ते ७.८०%
येस बँक    ३.२५ ते ७.७५%
कॅनरा बँक     ४ ते ७.३०%
आयडीएफसी फर्स्ट    ३.५ ते ७.५%
एयू स्मॉल फायनान्स    ४ ते ८.६०%

१ ते ३ वर्षांची एफडी करा 

- सुरक्षित गुंतवणुकीवर निश्चित उत्पन्न हवे असेल तर लोकांनी आता एक ते तीन वर्षांसाठी एफडीमध्ये पैसे गुंतवावेत. 
- मागच्या १५ महिन्यांत रेपो रेट २.५ टक्क्यांनी वाढल्याने एफडीचे व्याजदर १.५ टक्क्यांनी वाढले आहेत; परंतु, आता व्याजदर वाढण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. 
- लोकांकडे एफडीमध्ये पुन्हा गुंतवणुकीची संधी आहे. आधी कमी दराच्या एफडीमध्ये पैसे गुंतविले असतील तर त्या मोडून तेच पैसे अधिक दराच्या एफडीमध्ये गुंतविण्याचा नक्की विचार करावा.

या बँकांनी २ महिन्यांत घटविले दर 

बँक     एफडी अवधी    केलेली घट    व्याजदर 
ॲक्सिस बँक      १७ महिने      ०.१०%      ७.१०%
पीएनबी      एक वर्ष     ०.०५%     ६.७५%
बँक ऑफ इंडिया     एक वर्ष     १.००%     ६.००%  
इंडसइंड बँक     दाेन वर्षे      ०.२५%     ७.५०% 
एयू एसएफबी     पाच वर्षे      ०.८५%     ८.२५%

 

Web Title: do not miss this opportunity to make fd in the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.