Lokmat Money >गुंतवणूक > असं करा रिटायरमेंट प्लॅनिंग की, आरामत जगू शकाल संपूर्ण आयुष्य; याप्रकारे करू शकता नियोजन

असं करा रिटायरमेंट प्लॅनिंग की, आरामत जगू शकाल संपूर्ण आयुष्य; याप्रकारे करू शकता नियोजन

आता बहुतांश लोकांकडे पेन्शचा पर्यायही नाही. अशा परिस्थितीत रिटायमेंटचं आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न निर्माण होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 02:58 PM2023-11-16T14:58:37+5:302023-11-16T15:01:06+5:30

आता बहुतांश लोकांकडे पेन्शचा पर्यायही नाही. अशा परिस्थितीत रिटायमेंटचं आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न निर्माण होतो.

Do retirement planning in such a way that you can live comfortably throughout your life you can plan in this way sip swp investment tips | असं करा रिटायरमेंट प्लॅनिंग की, आरामत जगू शकाल संपूर्ण आयुष्य; याप्रकारे करू शकता नियोजन

असं करा रिटायरमेंट प्लॅनिंग की, आरामत जगू शकाल संपूर्ण आयुष्य; याप्रकारे करू शकता नियोजन

Retirement Planning : आपण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कामात आणि जबाबदारींमध्ये इतके व्यस्त असतो की अनेकदा आपल्याला रिटायरमेंटनंतरचं प्लॅनिंग करता येत नाही. आता बहुतांश लोकांकडे पेन्शचा पर्यायही नाही. अशा परिस्थितीत रिटायमेंटचं आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न निर्माण होतो. त्याच वेळी, रिटायरमेंटनंतरच्या आपल्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी आतापासूनच योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याची जबाबदारीही आपल्यावरच आहे. तर जाणून घेऊया कोणते आहेत हे पर्याय.

हेदेखील आवश्यक
सर्वप्रथम तुम्हाला महागाईमुळे वाढत्या जीवनावश्यक खर्चासह आरोग्यसेवा, मुलांचे शिक्षण, त्यांचं लग्न आणि आपल्या वाढत्या वयातील आवश्यक गरजा यांचा अधिक विचार करावा लागेल. या काळात दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आत्मनिर्भर राहणंही महत्त्वाचं आहे. काही वेळा आपली मुलं आपल्या शहरापासून दूर किंवा नोकरीसाठी परदेशात देखील असू शकतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही निवृत्तीचे नियोजन करता तेव्हा तुम्हाला हेही लक्षात ठेवावे लागेल.

दोन प्रमुख टप्पे
रिटारमेंट प्लॅनिंगचे दोन प्रमुख टप्पे आहेत. फंडात सातत्यानं वाढ करणं आणि फंडाची साईज कमी करणं. फंड वाढवण्याचा टप्पा SIP च्या माध्यमातून पूर्ण केला जाऊ शकतो. हा एक प्रसिद्ध आणि आवडता पर्याय आहे. तर दुसऱ्या पर्यायाबद्दल बहुतांश लोकांना फार कमी माहिती आहे. हा मंथली पेआऊटद्वारे तुमच्या निवृत्ती काळात तुम्हाला मदत करू शकतो. याला सिस्टमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन म्हणजेच SWP म्हणतात.

काय आहे SWP?
SWP देखील एसआयपी प्रमाणेच आहे. जसे एसआयपीच्या बाबतीत आपण शिस्तबद्ध पद्धतीनं गुंतवणूक करतो, त्याचप्रमाणे एसडब्ल्यूपीमध्ये आपण शिस्तबद्ध पद्धतीने पैसे काढतो. सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन हा जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुमच्या गुंतवणुकीतून पैसे काढण्याचा एक मार्ग आहे. सेवानिवृत्तीसाठी किंवा तुम्ही काही काळ नोकरीतून विश्रांती घेत असताना हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

तुम्ही काम करत नसतांनाही विविध खर्चाची बिले येत राहतात, जी तुम्हाला भरावी लागतात. त्यामुळे तुम्हाला ती बिले भरण्यासाठी मासिक उत्पन्न किंवा मासिक आवक आवश्यक आहे. यासाठी एसडब्ल्यूपी हा सोयीस्कर पर्याय आहे. तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडाला महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला निश्चित रक्कम डेबिट करण्यासाठी एकदा सूचना द्यावी लागेल आणि त्यानंतर पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील.

इन्कम टॅक्समध्ये फायदा
जेव्हा तुम्ही SWP मधून पैसे काढता तेव्हा तुमच्या मुद्दलाचा एक भाग आणि तुमच्या नफ्याचा काही भाग तुम्हाला परत केला जातो. अशा परिस्थितीत ते  टॅक्स एफिशियंट मानलं जातं. तुम्हाला परत केलेल्या कॅपिटलवर कोणताही कर लागत नाही आणि जर तुम्ही इक्विटी किंवा हायब्रीड फंडातून पैसे काढत असाल, तर तुम्ही मिळालेल्या नफ्यावर १० टक्के कर भरू शकता. सध्याच्या कर नियमांनुसार, कमीत कमी ६५ टक्के किंवा त्याहून अधिक इक्विटी असलेल्या म्युच्युअल फंडाला एक वर्षासाठी ठेवल्यास नफ्यावर १० टक्के कर आकारला जातो. तर बँक एफडीवर तुम्हाला तुमच्या स्लॅबनुसार कर भरावा लागेल. या उत्पन्नावर ते ३४ टक्क्यांच्या जवळपास बसते.

कम्पाऊंडिंगचा फायदा
पैसे काढल्यानंतर उरलेला फंड गुंतवलेलाच राहतो आणि तुम्हाला त्यावर परतावा मिळत राहतो, यामुळे तुम्हाला कम्पाऊंडिंगचा लाभ मिळत राहतो. तुमच्या कोणत्याही विशिष्ट बाबीसाठी तुम्ही एकरकमी पैसे काढू शकता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Do retirement planning in such a way that you can live comfortably throughout your life you can plan in this way sip swp investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.