Join us  

How to become rich: तुम्हालाही श्रीमंत बनण्याची इच्छा आहे? 'या' ३ ठिकाणी करा गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 7:05 PM

श्रीमंत होण्यासाठी योग्य वेळी आणि स्मार्ट पद्धतीनं गुंतवणूक करणं आवश्यक आहे.

आपण आयुष्यात श्रीमंत व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. परंतु आपल्यापैकी अनेक जण योग्य वेळी योग्य पावलं उचलत नाहीत. श्रीमंत होण्यासाठी योग्य वेळी आणि स्मार्ट पद्धतीनं गुंतवणूक करणं आवश्यक आहे. पैसे कसे वाढवायचे हे जाणून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. तसेच, तुमची गुंतवणूक लवकर सुरू करणंही तितकंच महत्त्वाचे आहे. तुम्ही जितकी लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका तुम्ही कंपाऊंडींग इंटरेस्टचा फायदा घेऊ शकता. श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही आणि जलद श्रीमंत होण्याचा कोणता फॉर्म्युलाही नाही. त्यासाठी फक्त संयम आणि शिस्त आवश्यक आहे. 

इक्विटीमध्ये गुंतवणूक

इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे हा निश्चित उत्पन्न मिळविण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला डिविडंट मिळतो. तसंच, जेव्हा इक्विटीची किंमत वाढते तेव्हा तुम्ही ती विकू शकता. यामध्ये गुंतवणुकीचा फायदा असा आहे की तुम्ही यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करू शकता. ब्लूचिप शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. यामुळे धोका किंचित कमी होतो. तुम्हाला दीर्घकाळात सातत्यपूर्ण परतावा मिळू शकतो.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

एक निश्चित आणि स्थिर उत्पन्नाच्या शोधात असलेल्यांसाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. हे फंड अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात आणि स्टॉक, बाँड आणि इक्विटीच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करतात. इक्विटीमधील गुंतवणुकीपेक्षा हे कमी जोखमीचे आहे. दीर्घकाळात तुम्ही चांगला फंड उभारू शकता. म्युच्युअल फंडांद्वारे स्थिर उत्पन्न मिळविण्यासाठी डिविडेंट म्युच्युअल फंड, इन्कम फंड आणि बॅलन्स्ड फंड यांसारखे अनेक पर्याय निवडता येतात.

रेंटल ऑफिस स्पेसमध्ये गुंतवणूक

भाड्यानं ऑफिस देऊन, तुम्ही स्वतःसाठी एक स्थिर उत्पन्न मिळवू शकता. तुमच्याकडे पैसे असल्यास, ऑफिसची जागा खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करा आणि ती भाड्याने देऊन त्यातून पैसे कमावू शकता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा