Join us

तुम्हाला Post Office च्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करायची आहे का? तर 'या' ५ गोष्टी नक्की जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 12:33 PM

तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणुकीशी संबंधित पाच महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करायची आहे का? जर तुमचं उत्तर होय असं असेल तर तुम्हाला या गुंतवणुकीशी संबंधित पाच महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

अल्पबचत योजनांत गुंतवणूक?नागरिकांना नियमित बचत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारकडून अल्पबचत योजनांचा पर्याय दिला जातो. गुंतवणुकीला सुरुवात करतानाही आधी अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला अशा अनेक सरकारी अल्प बचत योजनांचे पर्याय सापडतील. गुंतवणूकदार परतावा आणि जोखीम यानुसार गुंतवणूकीचा पर्याय निवडतात. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणं हा लोकांसाठी नेहमीच पहिला पर्याय राहिला आहे.

माहिती आवश्यकअल्प बचत योजनांमध्ये पीपीएफ, एसएसव्हाय, एससीएसएस, एनएससी, पोस्ट ऑफिस डिपॉझिट आणि केव्हीपी यांचा समावेश होतो. तुम्ही कुठलीही गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी त्याची आधी माहिती घ्या. गुंतवणुकीचा कालावधी, व्याजाची रक्कम आणि नियम या सर्व गोष्टी वेगवेगळ्या असतात. गुंतवणूकदारांच्या सोयीनुसार आणि बचतीच्या आकारानुसार योजना निवडली पाहिजे. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूकदारांच्या गरजेनुसार अनेक योजना चालवल्या जातायत.

अधिक रिटर्नपोस्ट ऑफिसच्या अनेक योजना अशा असतात. ज्यामध्ये तुम्हाला बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळते. पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या योजनेत तुम्हाला जास्त परतावा मिळत आहे हे जाणून घ्या.

परताव्याची हमीपोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला परताव्याची हमी मिळते. यासह गुंतवणूकदार त्यांचे करपात्र उत्पन्न कमी करून कर वाचवू शकतात. म्हणजेच पोस्ट ऑफिस योजना हमी आणि कर लाभांसह येतात.

व्याजदरसरकारद्वारे प्रत्येक तिमाहित या योजनांवरील व्याजदरचा आढावा घेतला जातो.

पोस्टाच्या काही योजना

किसान विकास पत्रसुकन्या समृद्धी खातंनॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटपीपीएफ अकाऊंटसीनिअर सीटिझन सेव्हिंग स्कीममंथली इन्कम स्कीम अकाऊंटटाईम डिपॉझिट अकाऊंटरिकरिंग डिपॉझिट अकाऊंटसेव्हिंग अकाऊंट

 

टॅग्स :गुंतवणूकपोस्ट ऑफिसपैसा