Lokmat Money >गुंतवणूक > मोठी गुंतवणूक करायची नसेल तर केवळ ₹५०० पासून या स्कीम्समध्ये करा गुंतवणूक, जमतील लाखो रुपये

मोठी गुंतवणूक करायची नसेल तर केवळ ₹५०० पासून या स्कीम्समध्ये करा गुंतवणूक, जमतील लाखो रुपये

आजकाल भविष्यासाठी गुंतवणूक करुन ठेवणं महत्त्वाचं झालं आहे. प्रत्येक वेळी गुंतवणूक हा शब्द म्हटला की मोठीच गुंतवणूक असा अनेकांचा समज होतो. पण तसं नाही. अगदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 02:41 PM2024-01-20T14:41:51+5:302024-01-20T14:41:59+5:30

आजकाल भविष्यासाठी गुंतवणूक करुन ठेवणं महत्त्वाचं झालं आहे. प्रत्येक वेळी गुंतवणूक हा शब्द म्हटला की मोठीच गुंतवणूक असा अनेकांचा समज होतो. पण तसं नाही. अगदी

don t want to invest big invest in these schemes starting from rs 500 only you will get lakhs of rupees sip ppf sukanya samriddhi post office | मोठी गुंतवणूक करायची नसेल तर केवळ ₹५०० पासून या स्कीम्समध्ये करा गुंतवणूक, जमतील लाखो रुपये

मोठी गुंतवणूक करायची नसेल तर केवळ ₹५०० पासून या स्कीम्समध्ये करा गुंतवणूक, जमतील लाखो रुपये

Investment Tips: आजकाल भविष्यासाठी गुंतवणूक करुन ठेवणं महत्त्वाचं झालं आहे. प्रत्येक वेळी गुंतवणूक हा शब्द म्हटला की मोठीच गुंतवणूक असा अनेकांचा समज होतो. पण तसं नाही. अगदी छोट्या रकमेपासूनही तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुम्ही ही गुंतवणूक दीर्घकाळ चालू ठेवणं महत्त्वाचं आहे. शक्य असल्यास, तुमचे उत्पन्न वाढत असताना तुमची गुंतवणूक वाढवत राहा. अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि लाखो रुपयांचा निधी तयार करू शकता. अशाच काही योजनांबद्दल येथे जाणून घेऊया.

एसआयपी

एसआयपीद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. तथापि, एसआयपी बाजाराशी जोडलेले आहे आणि त्यातील गुंतवणूक जोखमीची मानली जाते. परंतु एसआयपीने गेल्या काही वर्षांत खूप चांगला परतावा दिल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांत एसआयपीची लोकप्रियताही झपाट्याने वाढली आहे. एसआयपीमध्ये सरासरी 12 टक्के परतावा मिळतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत, लोक दीर्घकाळासाठी एसआयपीद्वारे चांगला नफा कमावतात. चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार एसआयपीमध्ये गुंतवलेली रक्कम कधीही वाढवू शकता. यामुळे तुमचा नफा आणखी वाढतो. 

जर तुम्ही 12 टक्क्यांनुसार हिशोब केला तर तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा 500 रुपये देखील गुंतवले तर 15 वर्षांनंतर, 12 टक्क्यांनुसार तुम्ही मॅच्युरिटीदरम्यान 2,52,288 रुपयांचा निधी जमा करू शकता. 20 वर्षानंतर ही मॅच्युरिटी रक्कम 4,99,574 रुपये होईल.

पीपीएफ

जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी तुमच्यासाठी फायदेशीर करार असू शकतो. ही एक सरकारी योजना आहे ज्यात 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. त्यात दरवर्षी किमान 500 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. या योजनेत तुम्हाला 7.1 टक्के दरानं चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. ही योजना 15 वर्षांनी मॅच्युअर होते. तुम्ही दर महिन्याला 500 रुपये देखील जमा केल्यास तुम्हाला वार्षिक 6000 रुपये जमा करावे लागतील. PPF कॅल्क्युलेटरनुसार, 15 वर्षांमध्ये तुम्ही याद्वारे 1,62,728 रुपये जोडू शकाल. जर तुम्ही ही स्कीम आणखी 5 वर्षे चालू ठेवली तर तुमच्याकडे 20 वर्षांत 2,66,332 रुपये जमा होतील.

सुकन्या समृद्धी

तुम्ही मुलीचे वडील असाल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेतही गुंतवणूक करू शकता. मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारनं या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. सध्या या योजनेवर 8.2 टक्के व्याज मिळत आहे. यामध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते आणि योजना 21 वर्षात मॅच्युअर होते. या योजनेत तुम्ही दरमहा 500 रुपये गुंतवल्यास, 15 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 90 हजार रुपये होईल. तुम्ही 15 ते 21 वर्षांच्या दरम्यान कोणतीही गुंतवणूक करणार नाही, परंतु तुमच्या रकमेवर 8.2 टक्के दरानं व्याज जोडलं जाईल. मॅच्युरिटीवर तुम्हाला 2,77,103 रुपये मिळतील. 

पोस्ट ऑफिस आरडी

पोस्ट ऑफिस आरडी देखील एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिस आरडी 5 वर्षांसाठी आहे. सध्या त्यावर 6.7 टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस आरडीमध्ये 100 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता. परंतु जर तुम्ही दरमहा 500 रुपये दराने वार्षिक 6000 रुपये जमा केले तर तुमची एकूण गुंतवणूक 30,000 रुपये होईल, ज्यावर तुम्हाला 5,681 रुपये व्याज मिळतील. मॅच्युरिटीवर तुम्हाला 35,681 रुपये मिळतील.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: don t want to invest big invest in these schemes starting from rs 500 only you will get lakhs of rupees sip ppf sukanya samriddhi post office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.