Donald Trump Business In India :डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) झाले आहेत. 78 वर्षीय ट्रम्प हे राजकारणातील एक मोठे व्यक्तीमत्व आहेच, पण ते एक यशस्वी उद्योजकही आहेत. ट्रम्प यांचा व्यवसाय जगभर पसरला आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये ट्रम्प यांनी गुंतवणूक केली आहे.
मुंबई ते गुरुग्राम पसरलेला व्यवसाय
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताशी घट्ट नाते आहे. राजकारणी म्हणून नाही, तर एक व्यावसायिक म्हणून ते भारताशी जोडले गेले आहेत. भारतातील अनेक शहरांमध्ये ट्रम्प कुटुंबाने रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकल्पांनाही ट्रम्प यांचेच नाव आहे. ट्रम्प यांना रिअल इस्टेट व्यवसायाचा वारसा मिळाला असून, त्यांनी तो मोठ्या उंचीवर नेला आहे. भारतात मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकातासारख्या शहरांमध्ये तुम्हाला 'ट्रम्प टॉवर' (Trump Tower) पाहायला मिळेल.
डोनाल्ड ट्रम्प यांची रिअल इस्टेट कंपनी 'द ट्रम्प ऑर्गनायझेशन' भारतामध्ये लोढा ग्रुप, पंचशील रियल्टी, एम3एम, ट्रिबेका, युनिमार्क आणि इरिओ यांच्या सहकार्याने रिअल इस्टेट व्यवसाय करते. महत्वाची बाब म्हणजे, ट्रम्प प्रकल्पांची किंमत जास्त असूनही त्यांना भारतात मोठी मागणी आहे.
मुंबईतील ट्रम्प टॉवर
मुंबईच्या वरळी भागातही 'ट्रम्प टॉवर' आहे. 700 एकरात पसरलेल्या या निवासी इमारतीतील फ्लॅटची किंमत कोटींमध्ये आहे. वरळीत 78 मजली इमारत आहे. लोढा ग्रुपच्या मदतीने येथील प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. प्रायव्हेट जेट सर्व्हिस आणि ट्रम्प कार्ड ही त्याची खासियत आहे. येथील फ्लॅटची सुरुवातीची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे.
पुण्यातील ट्रम्प टॉवर
पंचशील रियल्टीच्या सहकार्याने पुण्यात ट्रम्प टॉवर्स बांधण्यात आले आहेत. पुण्यात 'ट्रम्प टॉवर' नावाच्या 23 मजली इमारती आहेत. ट्रम्प टॉवरमधील फ्लॅटची किंमत 15 कोटींहून अधिक आहे.
गुरुग्राम येथे ट्रम्प यांची गुंतवणूक
राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये दोन 50 मजली ट्रम्प टॉवर्स आहेत. येथील फ्लॅटची सुरुवातीची किंमत 4 कोटींहून अधिक आहे.
कोलकात्यात ट्रम्प टॉवर
भारतीय कंपनी युनिमार्क ग्रुप, आरडीबी ग्रुप आणि ट्रिबेका डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने कोलकाता येथे 'ट्रम्प टॉवर' बांधण्यात आला आहे. या टॉवरची उंची 39 मजली आहे. कोलकाता येथील ट्रम्प टॉवरमधील फ्लॅटची सुरुवातीची किंमत 3.75 कोटी रुपये आहे.