शेअर बाजारातीलगुंतवणूकीवर जसा चांगला नफा मिळतो, तसं चुकीच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास मोठं नुकसानही होऊ शकतं. यामुळे योग्य अभ्यास करूनच यात पैशांची गुंतवणूक करणं आवश्यक आहे. स्मॉल कॅप शेअर्सची निवड करणं महत्त्वाचं असतं. गेल्या आठवड्यापासून निफ्टीत तेजी दिसून आली होती. यानंतरही म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलियो मॅनेजमेंट सर्व्हिसेस १० नव्या स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत.
गुंतवणूकदारांना स्वारस्य असलेल्या या स्मॉलकॅप शेअर्समध्ये इक्विटाल स्मॉल फायनॅन्स बँक, बिर्ला कॉर्पोरेशन, सनोफी इंडियासारख्या शेअर्सचा समावेश आहे. यामध्ये गेल्या महिन्यात चांगली खरेदी दिसून आली. मल्टिबॅगर स्मॉलकॅप शेअर इक्विटास स्मॉल फायनॅन्स बँकेनं गेल्या १ वर्षात १३३ टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. ९ म्युच्युअल फंड्स स्कीमनं इक्विटास स्मॉल फायनॅन्स बँकेचे शेअर्स खरेदी केले आहेत. तर 10mps, १३ युलिप आणि एआयएफनं मे महिन्यात इक्विटासचे शेअर्स खरेदी केले आहेत.
एमपी बिर्ला समूहाची कंपनी बिर्ला कॉर्पोरेशनच्या १६ स्कीम्सनं शेअर्स खरेदी केले आहेत. सनोफी इंडियाची १५ म्युच्युअल फंड स्कीम्सनं खरेदी केली आहे. म्युच्युअल फंडाच्या निवडींमध्ये समाविष्ट असलेल्या इतर स्मॉलकॅप शेअर्समध्ये इंडियामार्ट इंटरमेश, अफल इंडिया, व्हीआयपी इंडस्ट्रीज, बिर्लासॉफ्ट, कॅन फिन होम्स, पीव्हीआर आयनॉक्स आणि एक्साइड इंडस्ट्रीज सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
जर सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांच्या आवडत्या शेअर्सबद्दल सांगायचं झालं यात झी एन्टरटेन्मेंटला अधिक पसंती आहे. यानंतर इप्का लॅब्स, पीव्हीआर आयनॉक्स, ग्लँड फार्मा, देबी केमिकल्स या शेअर्सचा समावेश आहे.
मे महिन्यात फंड मॅनेजर्सनं ब्रिगेड एन्टरप्राईझेस, केन फिन्होम्स, अंबर एन्टरप्रायझेस, क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण, इक्विटास स्मॉल फायनॅन्स बँक, गुजरात स्टेट पेट्रोनेटस आयडीएफसी, पीएनबी इन्फ्राटेक आणि आयएमएससारख्या शेअर्समध्ये हिस्सा वाढवला आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)