रिटायरमेंटसाठी एनपीएस, अटल पेन्शन योजना, ईपीएफ-पीपीएफ यासह अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. सर्वाधिक परतावा मात्र रिटायरमेंट म्युच्युअल फंडांतून मिळण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षांत रिटायरमेंट फंडांनी सरासरी १३ टक्के परतावा दिला आहे.
नियम काय आहे?ही एक ओपन-एंडेड रिटायरमेंट योजना आहे. यात लॉक-इन अवधी पाच वर्षांचा अथवा निवृत्तीच्या वयापर्यंत असतो. म्हणजेच ५ वर्षांच्या आत यातील रक्कम काढता येत नाही. रिटायरमेंट म्युच्युअल फंडांतील व्यवस्थापनाधीन संपदा (एयूएम) १७ हजार कोटी रुपये आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे?निवृत्तीसाठी १० वर्षे बाकी असतील, तर तुमच्यासाठी इक्विटीमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मात्र, निवृत्ती जवळ असेल, तर इक्विटी गुंतवणूक जोखमीची होऊ शकते. अशा परिस्थितीत इक्विटी आणि डेट फंड यात समतोल साधावा. निवृत्ती जसजसी जवळ येईल, तसतसे इक्विटीमधून डेटमध्ये स्थलांतरित व्हावे.
किती मिळेल परतावा?डेट ओरिएंटेड रिटायरमेंट फंडांत ५ वर्षांसाठी गुंतवणूक असेल तर ७ ते ९ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. डेट आणि इक्विटीयांचा समतोल असेल, तर १० ते १२ टक्के परतावा मिळू शकतो. इक्विटीमध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक असेल, तर १२ ते २० टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. मात्र, यात जोखीम अधिक असते.