नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार स्कीम आणली आहे. या स्कीमद्वारे तुम्ही मोठा नफा कमवू शकता. पोस्ट ऑफिसची रेकरिंग डिपॉझिट स्कीम (Post Office Recurring Deposit) आपल्या ग्राहकांना चांगला परतावा देत आहे. सध्या म्युच्युअल फंडाचे (Mutual Fund) युग आहे आणि प्रत्येकजण त्यामध्ये गुंतवणूक करतो, परंतु म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे थोडे जोखमीचे असते आणि पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे.
दर तीन महिन्यांनी मिळेल व्याज
पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) स्कीम ही एक लहान बचत योजना आहे. तुम्हाला हवे तितके दिवस तुम्ही या स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही यामध्ये 1, 2 वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ गुंतवणूक करू शकता. या स्कीमअंतर्गत दर तीन महिन्यांनी तुम्हाला व्याज मिळेल. पोस्ट ऑफिसद्वारे दर तिमाहीत तुमच्या खात्यात व्याज जमा केले जाईल.
किती मिळेल व्याजदर?
या स्कीमवर 5.8 टक्के दराने व्याज मिळेल. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी आपल्या सेव्हिंग स्कीमचे दर निश्चित करते. या स्कीममध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून तुम्ही लाखो जमा करू शकता. या स्कीमद्वारे तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. जर तुम्ही या स्कीममध्ये 12 हप्ते जमा केले तर या आधारावर तुम्ही बँकांकडून कर्ज घेऊ शकता. तुमच्या खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून मिळेल.
कसे मिळतील 16 लाख?
तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये (Post Office Recurring Deposit) दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवल्यास 10 वर्षांनंतर तुम्हाला 16 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. तुम्ही 10 वर्षात 12 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. ज्यावेळी स्कीमचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परतावा म्हणून 4,26,476 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला 10 वर्षांनंतर एकूण 16,26,476 रुपये मिळतील.