Join us

SBI च्या 'या' स्कीममध्ये होते दर महिन्याला कमाई; मिळतात हे फायदे, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 12:11 PM

SBI Annuity Deposit Scheme Benefits: देशातील सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांना एक विशेष स्कीम ऑफर करत आहे. यामध्ये, एकरकमी पैसे जमा करून, तुम्हाला दरमहा व्याजासह हमी परतावा मिळतो.

SBI Scheme: देशातील सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांना एक विशेष स्कीम ऑफर करत आहे. यामध्ये, एकरकमी पैसे जमा करून, तुम्हाला दरमहा व्याजासह हमी परतावा मिळतो. ही स्कीम म्हणजे एसबीआय एन्युटी डिपॉझिट स्कीम (SBI Annuity Deposit Scheme). स्टेट बँकेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा डिपॉझिटर्स एकाच वेळी रक्कम जमा करतात, तेव्हा त्यांना समान मासिक हप्त्यांमध्ये मूळ रक्कम आणि व्याजाद्वारे कमाई होते. खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर प्रत्येक तिमाहीत चक्रवाढीच्या आधारे व्याज मोजलं जातं.  

एफडी प्रमाणेच मिळतं व्याज 

स्टेट बँकेच्या वेबसाइटनुसार, तुम्ही एसबीआय ॲन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये ३६, ६०, ८४ किंवा १२० महिन्यांसाठी जमा करू शकता. ही स्कीम स्टेट बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. त्यात तुम्हाला हवे तेवढे पैसे जमा करू शकता. दरम्यान, किमान डिपॉझिट कमीत कमी १००० रुपये मंथली ॲन्युइटी प्रमाणे करावं लागेल. स्कीममध्ये उपलब्ध असलेल्या व्याजाबद्दल सांगायचं झालं तर, एसबीआयच्या टर्म डिपॉझिट म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटवर (Fixed Deposit) मिळणारं व्याज या स्कीमच्या ग्राहकांनादेखील मिळतं. 

पहिले प्री क्लोजर कधी होतं? 

एसबीआय ॲन्युइटी डिपॉझिट स्कीममधील (SBI Annuity Deposit Scheme) ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास योजना मुदतीपूर्वी बंद केली जाऊ शकते. याशिवाय १५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर प्री मॅच्युअर पेमेंट करता येते. मात्र, यामध्ये प्री-मॅच्युअर पेनल्टीही भरावी लागते. पेनल्टीचा दर बँकेच्या एफडीवर लागणाऱ्या रेटवर घेतली आकारला जातो. हे खाते सिंगल किंवा जॉईंट असू शकतं. एसबीआयच्या या योजनेंतर्गत, एखाद्याला आवश्यकतेनुसार ॲन्युइटीच्या शिल्लक रकमेच्या ७५ टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्ट/कर्ज मिळू शकते. 

(टीप - ही माहिती स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेण्यात आलेली आहे.) 

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडिया