Join us  

Elon Musk चे स्थान धोक्यात; येत्या 35 दिवसांत Gautam Adani जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 1:48 PM

भारतीय उद्योगपती गौतम अदानी 121 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर इलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.

भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) सध्या ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये 121 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. इलॉन मस्क (Elon Musk) निश्चितपणे $ 133 बिलियनसह दुसऱ्या स्थानावर आहेत, परंतु त्यांचे स्थान आता धोक्यात आले आहे. 2022 मध्ये अदानीची संपत्ती $ 44 अब्जाने वाढली आहे तर मस्कला $ 137 बिलियन तोटा झाला आहे. इलॉन मस्कच्या संपत्तीत अशीच घट होत राहिली आणि गेल्या वर्षीप्रमाणे अदानींच्या संपत्तीत वाढ होत राहिली, तर गौतम अदानी लवकरच इलॉन मस्कला मागे टाकत जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतील.

अदानी 35 दिवसात नंबर दोनवर येतीलफायनान्शिअल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, अदानींना दुसरे स्थान मिळवण्यासाठी 5 आठवडे किंवा 35 दिवस लागू शकतात. यापूर्वी 13 डिसेंबर 2022 रोजी इलॉन मस्क यांनी जगातील सर्वात मोठ्या अब्जाधीशाचा दर्जा गमावला होता. त्यांची जागा फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी घेतली आहे. तसेच, इलॉन मस्कच्या नावावर आणखी एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. मस्क ही जगातील एकमेव व्यक्ती आहे, जिने तब्बल $200 अब्ज गमावले आहेत.

यामुळे मस्कला मोठा तोटाटेस्ला इलेक्ट्रिक आपल्या वाहनांच्या उच्च मूल्यांकनामुळे अडचणीत आली आहे. टेस्लाच्या शांघाय प्लांटमध्ये उत्पादन कमी करण्याबरोबरच, ते यूएस ग्राहकांना मोठी सवलत देत आहेत. ब्लूमबर्गनुसार टेस्ला स्टॉकमधील अलीकडील घसरणीमुळे मस्कने $137 अब्ज गमावले आहेत. 4 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांची संपत्ती $340 अब्ज होती. मस्कच्या एकूण संपत्तीचा मोठा हिस्सा टेस्ला स्टॉकमधून येतो. 2020 आणि 2021 मध्ये वॉल स्ट्रीटवर चढाई केल्यानंतर, 2022 मध्ये टेस्लाचे शेअर्स 65 टक्क्यांनी घसरले, ज्यामुळे मस्कच्या संपत्तीला मोठा धक्का बसला आहे.

अदानींच्या संपत्तीत सर्वाधिक वाढदुसरीकडे, ब्लूमबर्गच्या वेल्थ इंडेक्समध्ये गौतम अदानी हे आशियातील पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी इतके उच्च स्थान मिळवले आहे. 2022 मध्ये जागतिक स्तरावर ज्यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे, अशा लोकांच्या यादीत अदानी अव्वल स्थानी आहे. गेल्या वर्षभरात त्यांच्या वैयक्तिक संपत्तीत $44 अब्ज वाढीमुळे त्यांनी बिल गेट्स आणि वॉरन बफे यांना मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे.

टॅग्स :गौतम अदानीएलन रीव्ह मस्कव्यवसाय