Join us

दर सेकंदाला लाखो रुपये कमावतात Elon Musk, लहानपणीच सुरू केले होते काम...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 2:40 PM

Elon Musk Birthday: टेस्ला-ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनी 12व्या वर्षी व्हिडिओ गेम बनवून कमाई सुरू केली होती.

Elon Musk Birthday: आज Tesla, Twiter चे CEO इलॉन मस्क(Elon Musk) यांचा वाढदिवस आहे. इलॉन यांचा जन्म 28 जून 1971 रोजी दक्षिण आफ्रिकेत झाला. वयाच्या 17व्या वर्षीच ते कॅनडाला आले. इलॉन 219 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षात आतापर्यंत त्यांची $81.8 अब्ज संपत्ती वाढली आहे. 

इलॉन मस्क लहानपणापासूनच खूप शांत होते आणि जास्त कुणाशी बोलत नव्हते. त्यांना लहानपणापासूनच पुस्तक वाचनाची आवड होती. इलॉन यांनी वयाच्या 10व्या वर्षी कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकली 12व्या वर्षी 'ब्लास्टर' नावाचा व्हिडिओ गेमही तयार केला होता. एका स्थानिक मासिकाने त्यांच्याकडून तो गेम पाचशे यूएस डॉलर्सला विकत घेतला. याला मस्क यांची पहिली 'बिझनेस अचिव्हमेंट' म्हणता येईल.

दर सेकंदाला लाखो रुपये कमाईइलॉन यांनी त्यांच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यातून प्रत्येक तरुणाने शिकले पाहिजे. इलॉन मस्क यांच्या कमाईबद्दल असे म्हटले जाते की, ते प्रत्येक सेकंदाला 68 लाख रुपये कमावतात. वयाच्या 27 व्या वर्षी मस्क यांनी 'X.com' नावाची कंपनी स्थापन केली होती. 2002 मध्ये eBay ने ही कंपनी विकत घेतली आणि मस्क यांना $165 मिलियन मिळाले. यानंतर त्यांनी Tesla ची सुरुवात केली आणि आज त्यांचा जगभर उद्योग पसरला आहे. इलेक्ट्रीक गाड्यांपासून, Ai आणि स्पेस सेक्टरपर्यंत त्यांच्या उद्योगाचे जाळे पसरले आहे.  

टॅग्स :एलन रीव्ह मस्कटेस्लाट्विटरव्यवसाय