Elon Musk Twitter: जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचा(Twitter) चा ताबा मिळवल्यानंतर एका मागून एक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यात कर्मचारी कपातीचा निर्णयही होता. एका मुलाखतीदरम्यान इलॉन मस्क यांनीच याबाबत माहिती दिली.
मस्क यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अंदाजे 8,000 ट्विटर कर्मचार्यांपैकी केवळ 1,500 कर्मचारी सध्या कंपनीत काम करत आहेत. कंपनी विकत घेतली तेव्हा 8,000 पेक्षा कमी कर्मचारी काम करत होते. इतक्या लोकांना कामावरुन काढणे अवघड काम आहे का? यावर मस्क म्हणाले, ते खूप कठीण आणि वेदनादायक होते.
ट्विटर विकणार नाहीइलॉन मस्क पुढे म्हणाले की, ट्विटरमधील त्यांचा कार्यकाळ अस्थिर होता, पण आता गोष्टी छान होत आहेत. मस्क यांचा दावा आहे की, त्यांनी ट्विटर विकत घेतले कारण त्यांना ते करावे लागले. अलीकडे, त्यांनी हेदेखील जाहीर केले की, ते ट्विटर विकणार नाहीत. त्यांना कोणी 44 अब्ज डॉलर दिले तरीही ते कंपनी विकण्याच्या विचारात नाहीत. त्यांनी पुढे असेही म्हटले की, एखाद्या खरेदीदाराकडे सत्य सांगण्याचे धैर्य असेल तरच ते कंपनी विकण्याचा विचार करतील.
ब्लू टिकचा शेवटपुढे माहिती देताना इलॉन मस्क म्हणाले की, ब्लू टिक चेकमार्क 20 एप्रिल रोजी संपत आहे. एखाद्या युजरने 20 एप्रिलपर्यंत ठरलेली रक्कम भरली, तर त्याला ब्लू टिक मिळेल. यापूर्वी ही तारीख 1 एप्रिल ठेवण्यात आली होती. तज्ञांच्या मते, ही तारीख आणखी वाढू शकते.