Join us  

EPF Balance: तुमच्या पीएफ खात्यात आतापर्यंत किती रक्कम आहे जमा? ‘असं’ सहजरित्या करा चेक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 4:09 PM

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रत्येक महिन्याला भविष्य निर्वाह निधीची (PF) विशिष्ट रक्कम कापली जाते.

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रत्येक महिन्याला भविष्य निर्वाह निधीची (PF) विशिष्ट रक्कम कापली जाते. ही रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) या भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थेकडे जमा केली जाते. ईपीएफओ प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावावर ईपीएफ खाते उघडते, ज्यामध्ये त्या कर्मचाऱ्याची पीएफ रक्कम जमा केली जाते. ईपीएफओने गेल्या काही वर्षांत ईपीएफ खात्यात जमा केलेली शिल्लक तपासणे आणि पीएफशी संबंधित इतर माहिती तपासणे खूप सोपे केले आहे.

सरकार जानेवारीच्या अखेरीस पीएफ खातेदारांच्या खात्यात व्याजाचे पैसे हस्तांतरित करू शकते अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत खातेदारांनी आपली शिल्लक रक्कम तपासणे गरजेचे आहे.

एसएमएसद्वारे तपासायासाठी तुम्हाला EPFO ​​कडे नोंदणीकृत असलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवरून 7738299899 वर "EPFOHO UAN LAN" लिहून मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुमच्या खात्याशी संबंधित ईपीएफ बॅलन्ससह इतर माहिती मिळेल.

मिस्ड कॉलद्वारेही माहितीयासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून फक्त 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. रिंग वाजल्यानंतर फोन आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि काही वेळाने तुम्हाला ईपीएफ शिल्लक आणि तुमच्या खात्याशी संबंधित इतर माहिती मेसेजच्या रूपात मिळेल.

ऑनलाईन कसा चेक कराल बॅलन्स?तुम्ही ईपीएफओच्या वेबसाइटवर लॉग इन करून तुमची ईपीएफ शिल्लक तपासू शकता. मात्र, यासाठी तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) माहित असणे आवश्यक आहे.

  1. यासाठी सर्वप्रथम EPFO ​​च्या 'MEMBER e-SEWA' वेबसाइटवर जा. येथे तुम्हाला वेबसाइटच्या तळाशी 'तुमचा UAN नंबर जाणून घ्या' हा पर्याय दिसेल. जर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक माहित असेल, तर तुम्ही थेट त्याच्या वर दिलेल्या 'Activate UAN' या पर्यायावर क्लिक करू शकता.
  2. आता ऑनलाइन शिल्लक तपासण्यासाठी EPF पासबुक पोर्टलला भेट द्या आणि UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  3. यानंतर पासबुक Download/View Passbook वर क्लिक करा. असे केल्यावर तुमच्या समोर पासबुक ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला शिल्लक रक्कम पाहता येईल.
टॅग्स :भविष्य निर्वाह निधीपैसा