Lokmat Money >गुंतवणूक > EPF Interest Rates: केव्हा खात्यात येणार व्याजाचे पैसे, आले की नाही - या ४ पद्धतींनी जाणून घ्या 

EPF Interest Rates: केव्हा खात्यात येणार व्याजाचे पैसे, आले की नाही - या ४ पद्धतींनी जाणून घ्या 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं नुकतीच आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. कोट्यवधी सदस्यांच्या पीएफ खात्यावरील व्याज आता वाढणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 09:20 AM2024-02-14T09:20:34+5:302024-02-14T09:21:44+5:30

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं नुकतीच आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. कोट्यवधी सदस्यांच्या पीएफ खात्यावरील व्याज आता वाढणार आहे.

EPF Interest Rates Know when the interest money will deposited in account whether deposited or not in these 4 ways online umang app sms missed call | EPF Interest Rates: केव्हा खात्यात येणार व्याजाचे पैसे, आले की नाही - या ४ पद्धतींनी जाणून घ्या 

EPF Interest Rates: केव्हा खात्यात येणार व्याजाचे पैसे, आले की नाही - या ४ पद्धतींनी जाणून घ्या 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) नुकतीच आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. कोट्यवधी सदस्यांच्या पीएफ खात्यावरील व्याज आता वाढणार आहे. शनिवारी, ईपीएफच्या व्याजदरात ०.१० टक्क्यांनी (EPF Ineterst Rate) वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. ईपीएफओनं २०२३-२४ साठी पीएफ व्याजदर ८.२५ टक्के निश्चित केला आहे. गेल्या ३ वर्षांतील हा उच्चांक आहे. सरकारच्या मंजुरीनंतर, २०२३-२४ साठी ईपीएफवरील व्याजदर ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांच्या खात्यात जमा केलं जाईल.
 

केव्हा व्याज जमा होणार?
 

जर तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ईपीएफ खात्यातून पैसे तुमच्या खात्यात येत नाहीत किंवा व्याज वाढलं तर वाढलेलं व्याजही तुमच्या बँक खात्यात येत नाही. ईपीएफ खात्यावर तुमच्या पगारातून पैसे कापले जात राहतात आणि तुम्हाला त्यावर वार्षिक व्याज मिळते. म्हणजेच, सरकार वर्षातून एकदा या योजनेअंतर्गत दर सुधारित करते आणि नंतर तुमच्या ईपीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेवर व्याज मोजलं जातं आणि त्यात जमा केलं जातं.
 

ईपीएफ खात्यातील व्याज मासिक आधारावर मोजलं जातं, परंतु ते वर्षातून एकदा तुमच्या खात्यात जमा केलं जातं. व्याजाचं क्रेडिट कधी दिले जाईल याविषयी, ईपीएफओनं ​​म्हटलंय की २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ग्राहकांना त्यांचे पूर्ण पैसे मिळतील.
 

बॅलन्स कसा तपासू शकता?
 

तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे आले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ईपीएफओनं जारी केलेलं तुमचे पासबुक ऑनलाइन तपासू शकता. हे करण्याचे अनेक मार्ग आहेत - ईपीएफओ पोर्टल, मिस्ड कॉल, उमंग ॲप आणि एसएमएसद्वारे तुम्ही हे तपासू शकता.
 

पोर्टलवर पासबूक कसं तपासाल?
 

१ - सर्वप्रथम, EPFO ​​पोर्टल https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जा. यासाठी तुम्ही तुमचा UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) अॅक्टिव्हेट असणं आवश्यक आहे.
२- साइट उघडल्यानंतर, 'Our Services'  टॅबवर जा आणि नंतर ‘for employees’  ड्रॉप-डाउन मेनू निवडा.
३- सर्व्हिस कॉलमच्या खाली असलेल्या 'member passbook' वर क्लिक करा.
४- पुढील पेजवर तुम्हाला तुमचा UAN आणि पासवर्ड टाकावा लागेल. कॅप्चा एन्टर करून लॉग इन करा.
५- लॉगिन केल्यानंतर, मेंबर आयडी एन्टर करा. यानंतर तुमची ईपीएफ शिल्लक दिसेल. यामध्ये, खात्यातील शिल्लक सोबतच, तुम्हाला सर्व ठेवींचे तपशील, एस्टॅबलिशमेंट आयडी, मेंबर आयडी, कार्यालयाचे नाव, एम्पलॉयी शेअर आणि एम्पलॉयर शेअरची माहिती देखील मिळते.
 

Missed Call वरुन कसं तपासाल?
 

तुम्ही 011- 22901406 वर मिस्ड कॉल देऊन तुमची ईपीएफ शिल्लक तपासू शकता. कॉल केल्यावर, तुम्हाला एक एसएमएस मिळेल ज्यामध्ये तुमची शिल्लक दिसून येईल. यासाठी तुम्हाला ईपीएफ खात्यासोबत रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. तुमचा पॅन आणि आधार क्रमांकासोबत तुमचे बँक खाते क्रमांक देखील तुमच्या UAN शी लिंक असले पाहिजे.
 

SMS वरुन कसं तपासाल?
 

मिस्ड कॉल सेवेप्रमाणे, तुमचे सर्व महत्त्वाचे दस्तऐवज UAN शी लिंक असले पाहिजेत, तरच तुम्ही ही सेवा वापरू शकाल. यासाठी तुम्हाला 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN ENG (किंवा ENG ऐवजी तुम्हाला ज्या भाषेत मेसेज हवा आहे त्याचा कोड लिहा) असा एसएमएस करावा लागेल.
 

UMANG App वरुन कसा पाहाल?
 

१- तुमच्या फोनवर UMANG (Unified Mobile Application for New-age Governance) ॲप इन्स्टॉल करा आणि लॉग इन करा. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर फोनमध्ये असला पाहिजे.
२- ॲपमधील 'EPFO Option' वर क्लिक करा.
३- आता ‘Employee Centric Services’ वर क्लिक करा.
४- पुढील पेजवर, ‘view passbook’  वर क्लिक करा.
५- पुढील पेजवर तुम्हाला तुमचा UAN टाकावा लागेल, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
६- आता OTP टाकून लॉगिन करा, लॉगिन केल्यानंतर तुमच्या पासबुकचा तपशील तुमच्या समोर असेल.

Web Title: EPF Interest Rates Know when the interest money will deposited in account whether deposited or not in these 4 ways online umang app sms missed call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.