Join us

EPF Vs PPF: कोणाचं वाढलं व्याज, तर कोणाचं नाही; दोघांत काय आहे फरक, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 10:53 AM

ईपीएफ अंतर्गत कर्मचारी आणि कंपनी दोघंही आपलं योगदान देतात. यानंतर्गत दोघांचं योगदान १२-१२ टक्के असतं. 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या (PPF) व्याजदरावर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी EPF वर ८.१५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. त्याचबरोबर पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. लोकप्रिय ठेव योजना PPF चा एप्रिल-जून तिमाहीसाठी व्याजदर ७.१ टक्के इतकाच असेल.

काय आहे फरक?ईपीएफ अंतर्गत कर्मचारी आणि कंपनी दोघंही योगदान देतात. याअंतर्गत १२-१२ टक्क्यांचं योगदान असतं. हे योगदान तुम्ही वॉलेंटरी प्रोविडंट फंड (VPF) अंतर्गत वाढवू शकता. तर पीपीएफ अंतर्गत गुंतवणूकदारांना वर्षात किमान ५०० रुपयांचं योगदान द्यावं लागतं. तर कमाल योगदानाची मर्यादा १ लाख ५० हजार रुपये आहे.

पीपीएफसाठी लॉक इन पीरिअड १५ वर्षांचा आहे. म्हणजेच १५ वर्षांपर्यंत तुम्ही पैसे काढू शकत नाही. परंतु काही अटींसह तुम्ही त्यापूर्वी पैसे काढू शकता.

टॅक्स बेनिफिट्सपीपीएफमध्ये कलम ८० सी अंतर्गत टॅक्स क्लेम करता येऊ शकतो. ईपीएफ कर आकारला जाऊ शकतो. मॅच्युरिटी रक्कम ५ वर्षे पूर्ण झाल्यावरच करमुक्त आहे. जर कोणत्याही संकटकाळासाठी आवश्यक समजून तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी पीपीएफचा लॉक इन पीरिअड सिस्टम उपयोगाची नाही. ईपीएफच्या तुलनेती पीपीएफमध्ये कमी व्याज मिळतं. तर दुसरीकडे ज्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या २० पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठीच ईपीएफचा पर्याय उपलब्ध आहे.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीगुंतवणूक