productivity linked bonus : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी संबंधित कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक आनंदाची बातमी आहे. ईपीएफओने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. हा बोनस २ महिन्यांच्या पगाराइतका असणार आहे. संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे, की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसोबत काम करणाऱ्या गट क आणि गट ब कर्मचाऱ्यांना प्रॉडक्टविटी लिंक्ड बोनस दिला जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रॉडक्टविटी लिंक्ड बोनस (PLB) देण्यास मंजुरी दिली होती.
या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही लाभ
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) मधून आधीच निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना प्रॉडक्टविटी लिंक्ड बोनस (PLB) दिला जाणार नाही. याव्यतिरिक्त, प्रासंगिक/कंत्राटी/अतिरिक्त विभागीय कर्मचारी देखील बोनससाठी पात्र नाहीत.
या लोकांना बोनस मिळेल
या बोनसबाबत EPFO ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, "कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कर्मचाऱ्यांना २०२३-२४ वर्षासाठी प्रॉडक्टविटी लिंक्ड बोनसच्या आगाऊ पेमेंटसाठी काही अटी व शर्ती देण्यात आल्या आहेत.
गट क आणि गट ब (अराजपत्रित) सर्व नियमित कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळेल. कर्मचारी प्रमाणानुसार सेवेत असावेत. तसेच त्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या मार्चच्या शेवटच्या दिवशी काम केले आहे.
एक वर्षापेक्षा कमी काळ सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही हा योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी त्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात किमान ६ महिने काम केलेले असावे.
EPFO काय आहे?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही भारत सरकारने स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. देशातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा संस्था आहे. ही संस्था प्रामुख्याने लोकांना सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यास प्रोत्साहित करते. EPFO श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या कक्षेत येते आणि त्याची स्थापना १९५२ मध्ये झाली.