Lokmat Money >गुंतवणूक > EPFO Calculation: शेअर मार्केटची रिस्क नको? PF खात्यातही जमा होतील ५ कोटी; कसं आहे गणित?

EPFO Calculation: शेअर मार्केटची रिस्क नको? PF खात्यातही जमा होतील ५ कोटी; कसं आहे गणित?

EPFO Interest Rate: सध्या शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमधून कोट्यावधी रुपयांचा निधी कसा जमवायचा याचं गणित सांगितलं जातं. मात्र, हे दोन्ही पर्याय जोखमीचे आहेत. मात्र, सुरक्षित असणाऱ्या EPFO मधूनही तुम्ही कोटींचा निधी जमा करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 02:40 PM2024-09-15T14:40:55+5:302024-09-15T14:44:37+5:30

EPFO Interest Rate: सध्या शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमधून कोट्यावधी रुपयांचा निधी कसा जमवायचा याचं गणित सांगितलं जातं. मात्र, हे दोन्ही पर्याय जोखमीचे आहेत. मात्र, सुरक्षित असणाऱ्या EPFO मधूनही तुम्ही कोटींचा निधी जमा करू शकता.

epfo calculation how much contribution in pf account for 3 to five crore rupees on retirement | EPFO Calculation: शेअर मार्केटची रिस्क नको? PF खात्यातही जमा होतील ५ कोटी; कसं आहे गणित?

EPFO Calculation: शेअर मार्केटची रिस्क नको? PF खात्यातही जमा होतील ५ कोटी; कसं आहे गणित?

EPFO Interest Rate : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना नोकरदारांसाठी वरदान मानली जाते. EPFO ही खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती निधी जमा करणारी संस्था आहे. पेन्शन योजना सारखे लाभ देखील यातून मिळतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्याअंतर्गत, कर्मचारी आणि मालक दोघांकडून समान योगदान दिले जाते. यावर सरकार वार्षिक व्याज देते. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडे सेवानिवृत्तीपर्यंत मोठी रक्कम जमा होते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला EPFO ​​अंतर्गत कोट्यवधी रुपये जमा करायचे असतील. तर तुम्हाला किती योगदान द्यायला हवे हे माहित आहे का? गणित समजून घेऊ.

सरकार किती व्याज देते?
केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यावरील व्याज (EPF व्याज दर) वार्षिक आधारावर ठरवते. सध्या सरकार पीएफ खात्यावर ८.२५ टक्के व्याज देत आहे. हे व्याज दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते. पीएफमध्ये ठेवीच्या व्याजावर कोणताही कर नाही, कारण ही करमुक्त योजना आहे.

आपत्कालीन परिस्थितीत निधी काढता येतो 
EPFO कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढण्याची सुविधा देखील मिळते. पुढील शिक्षण, लग्न, घराचे बांधकाम आणि आजारपण यासारख्या विशिष्ट खर्च भागवण्यासाठी कर्मचारी त्यांच्या EPF मधून आपत्कालीन निधी काढू शकतात. मात्र, फारच आपात्कालीन परिस्थितीत हा निधी वापरावा असा सल्ला दिला जातो. कारण, तुमच्या निवृत्तीनंतर यातून पेंशन मिळू शकते.

३ ते ५ कोटींचा निधी कधी जमा होईल?
निवृत्तीनंतर ३ कोटी रुपये मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला ४० वर्षे दरमहा ८,४०० रुपये योगदान द्यावे लागेल. मॅच्युरिटीवर, तुम्हाला सध्याच्या ८.२५ टक्के व्याजदराने एकूण ३,०१,९४,८०४ रुपये मिळतील.
तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर ४ कोटी रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला ४० वर्षे दरमहा ११,२०० रुपये योगदान द्यावे लागेल. त्यानंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला सध्याच्या ८.२५ टक्के व्याजदराने एकूण ४,०२,५९,७३८ रुपये मिळतील.

ईपीएफमधील शिल्लक कशी तपासायची?
जर तुमचा मोबाईल नंबर EPF खात्याशी लिंक असेल तर 9966044425 वर मिस कॉल देऊन शिल्लक तपासता येईल. 7738299899 वर 'EPFOHO UAN ENG' एसएमएस पाठवून शिल्लक तपासली जाऊ शकते. ईपीएफ पासबुक पेजवर लॉग इन करून शिल्लक तपासली जाऊ शकते. उमंग ॲपद्वारेही तुम्ही शिल्लक तपासू शकता.

Web Title: epfo calculation how much contribution in pf account for 3 to five crore rupees on retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.