Join us

EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 3:29 PM

EPFO Mobile Number Update Online : जर तुमचा मोबाइल नंबर ईपीएफओशी लिंक नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पाहूया नवा मोबाइल नंबर कसा लिंक करता येईल.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना आता बहुतांश सुविधा ऑनलाइन मिळतात. कोणत्याही प्रकारची माहिती द्यायची असल्यास ती रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर येते. ईपीएफओशी संबंधित सर्व कामं वेबसाइट किंवा उमंग अॅपच्या माध्यमातून केली जातात. परंतु ईपीएफओशी संबंधित कोणतंही काम करण्यासाठी आपल्या पीएफ खात्यात रजिस्टर्ड मोबाइल नंबर अॅक्टिव्ह असणं खूप महत्वाचम आहे, कारण ईपीएफओ यावर ओटीपी पाठवतो. 

ओटीपी एन्टर केल्यानंतरच पुढील प्रक्रिया करता येते. त्याचबरोबर ईपीएफओकडून कोणत्याही प्रकारची माहिती एसएमएसद्वारे रजिस्टर्ड क्रमांकावर येते. पण जर तुमचा रजिस्टर्ड नंबर आता अॅक्टिव्ह नसेल आणि त्याऐवजी तुम्हाला नवीन नंबर अपडेट करायचा असेल, तर तुम्ही घरबसल्या हे काम सहज करू शकता. ते कसं करावं ते पाहू. 

नवा मोबाइल नंबर कसा अपडेट करावा?

  • सर्वप्रथम तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाइलवर यूएएन पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ओपन करा. यानंतर तुमचा यूएएन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.
  • यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. या पेजवर, वरच्या बारमधील मॅनेज टूल्स टॅबवर क्लिक करा आणि कॉन्टॅक्ट डिटेल्सवर जा.
  • त्यानंतर चेक मोबाइल नंबर पर्यायावर क्लिक करा. एक नवीन सेक्शन उघडेल. येथे तुम्हाला तुमचा नवीन मोबाइल नंबर दोनदा टाकावा लागेल.
  • आता 'Get Authorization Pin'वर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन नंबर दिसेल. या नंबरवर तुम्हाला ४ अंकी पिन मिळेल. हा पिन पेजवरील रिकाम्या बॉक्समध्ये भरा आणि खाली सेव्ह चेंजेसवर क्लिक करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर यूएएन पोर्टलवर अपडेट होईल. यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून नवीन नंबर अपडेट झाल्याचा मेसेजही येईल.
टॅग्स :भविष्य निर्वाह निधीगुंतवणूक