Lokmat Money >गुंतवणूक > EPFO Interest Rate: खासगी नोकरी करणाऱ्यांना बसणार धक्का; PF वरील व्याजदर कमी होणार

EPFO Interest Rate: खासगी नोकरी करणाऱ्यांना बसणार धक्का; PF वरील व्याजदर कमी होणार

EPFO Interest Rate: गेल्या काही वर्षात पीएफवरील व्याज कमी होत आहे. सध्या यावर 8.1 टक्के व्याज मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 05:59 PM2023-03-05T17:59:01+5:302023-03-05T17:59:41+5:30

EPFO Interest Rate: गेल्या काही वर्षात पीएफवरील व्याज कमी होत आहे. सध्या यावर 8.1 टक्के व्याज मिळते.

EPFO Interest Rate: Private Jobbers Will Get A Shock; Interest rate on PF will decrease | EPFO Interest Rate: खासगी नोकरी करणाऱ्यांना बसणार धक्का; PF वरील व्याजदर कमी होणार

EPFO Interest Rate: खासगी नोकरी करणाऱ्यांना बसणार धक्का; PF वरील व्याजदर कमी होणार

EPFO Interest Rate: खाजगी क्षेत्रात (Pvt Sector) काम करणाऱ्या कोट्यवधी लोकांना लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पीएफवरील व्याजदराबाबत या महिन्यात मोठा निर्णय घेतला जाणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याज आणखी कमी होण्याची शक्यता आहे. ही बातमी निराशाजनक आहे, कारण PF वर आधीच गेल्या 43 वर्षातील सर्वात कमी व्याज मिळत आहे.

व्याजदर किती कमी झाले
सध्या ईपीएफओचे साडेसहा कोटींहून अधिक सदस्य आहेत. पीएफवर उपलब्ध व्याज दर अनेक दशकांमधील सर्वात कमी पातळीवर आहे. EPFO ने 2021-22 साठी PF व्याज दर 8.1 टक्के निश्चित केले होते, जे 1977-78 नंतर PF वरील सर्वात कमी व्याजदर आहे. यापूर्वी 2020-21 मध्ये पीएफवर 8.5 टक्के दराने व्याज मिळत होते. 2020-21 या आर्थिक वर्षात पीएफच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. याच्या एक वर्ष आधी म्हणजे 2019-20 मध्ये हा व्याजदर 8.65 टक्क्यांवरुन 8.5 टक्के करण्यात आला होता.

कोट्यवधी लोकांना फटका बसणार
आता 25-26 मार्च रोजी EPFO ​​ची बैठक होणार आहे, ज्यामध्ये व्याजावर निर्णय घेतला जाऊ शकतो. एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पीएफवरील व्याज आणखी 8 टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकते. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधी अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. या कारणास्तव, पीएफवरील व्याज जास्त कमी करण्यास वाव नाही, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत ते कमी करणे शक्य आहे. असे झाल्यास खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी लोकांचे थेट नुकसान होणार आहे.

ईपीएफओ या ठिकाणी गुंतवणूक करते
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ​​अनेक ठिकाणी पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा केलेली रक्कम गुंतवते. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा काही भाग व्याजाच्या स्वरुपात खातेदारांना परत केला जातो. सध्या EPFO ​​कर्जाच्या पर्यायांमध्ये 85 टक्के गुंतवणूक करते, ज्यामध्ये सरकारी रोख आणि बाँडचा समावेश आहे. उर्वरित 15 टक्के रक्कम ईटीएफमध्ये गुंतवली जाते. पीएफचे व्याज इक्विटीच्या कमाईच्या आधारावर ठरवले जाते.

Web Title: EPFO Interest Rate: Private Jobbers Will Get A Shock; Interest rate on PF will decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.