EPFO Online Nominee Process : जर तुम्ही EPFO चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी हे एक महत्त्वाचे अपडेट आहे. आता सर्व सदस्यांना नॉमिनी जोडणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला पेन्शन, विमा यांसारख्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर खात्याला नॉमिनी जोडणे आवश्यक असल्याचे ईपीएफओकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तुम्ही तुमच्या नॉमिनीचं नाव अजून जोडलं नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. हे काम तुम्ही घरी बसूनही करू शकता. चला संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने जाणून घेऊया.
Follow these easy steps to file EPF/EPS nomination digitally.#SocialSecurity#EPF#Pension#ईपीएफओ#ईपीएफ#AmritMahotsav @AmritMahotsavpic.twitter.com/bSpwnb5sE7
— EPFO (@socialepfo) August 21, 2022
EPFO अकाऊंटला नॉमिनी जोडण्याची प्रोसेस
- सर्वप्रथम EPFO च्या वेबसाईटवर लॉग इन करा. त्यानंतर Services सेक्शनवर जा.
- त्यानंतर For Employees सेक्शनवर जाऊन ‘Member UAN/Online Service वर क्लिक करा.
- त्यानंतर युएएनच्या माध्यमातून लॉग इन करा.
- ‘Manage Tab' मध्ये e-Nomination सिलेक्ट करा.
- यानंतर 'Provide Details' वर जाऊन तुमची पूर्ण माहिती भरा आणि सेव्ह वर क्लिक करा.
- यानंतर 'YES' वर जाऊन ज्या व्यक्तीचं नॉमिनी म्हणून नाव द्यायचं आहे त्याची माहिती भरा.
- ईपीएफ सदस्याला आपल्या कुटुंबातील एक किंवा अधिक व्यक्तींना नॉमिनी म्हणून ठेवू शकता.
- याच्या 'Nomination Details’ वर जाऊन नॉमिनीची अमाऊंट निश्चित करा आणि ‘Save EPF Nomination' वर क्लिक करा.
- आता सदस्याला ओटीपी जनरेट करण्यासाठी 'e-Sign' वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आधार लिंक्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो सबमिट करा.
- संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अन्य कोणतंही डॉक्युमेंट घेऊन ऑफिसमध्ये जात सबमिट करण्याची गरज भासणार नाही.