EPFO Tips: खासगी नोकरी करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी(PF) चा लाभ दिला जातो. निवृत्त झाल्यानंतर पैशांची अडचण होऊ नये, यासाठी ही सुविधा सरकारकडून करण्यात आली आहे. अनेकजण नोकरी बदलल्यानंतर पीएफचे पैसे काढून घेतात. तुम्हीही असेच करत असाल, तर तुम्ही तुमच्या भविष्याशी खेळत आहात. नोकरी बदलल्यानंतर पीएफचे पैसे काढल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम पीएफमध्ये जमा केली जाते. सरकार या रकमेवर वार्षिक आधारावर व्याज देते. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी 8.15 टक्के व्याजदर निश्चित केले आहे.
15 हजार रुपये पगार असणाराही मोठी रक्कम गोळा करू शकतो
पीएफचे पैसे काढल्याने काय नुकसान होऊ शकते, ते समजून घेऊ. समजा एखाद्याचा पगार दरमहा 15 हजार रुपये आहे. ईपीएफओच्या नियमांनुसार, अशा कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात दरमहा 2351 रुपये जमा केले जातात, ज्यामध्ये कर्मचारी आणि कंपनी, दोघांचे योगदान असते. सध्याच्या 8.15 टक्के व्याजानुसार, पीएफ खात्यात दरमहा 2351 रुपये जमा केले, तर 10 वर्षांत एकूण 4.34 लाख रुपये जमा होतील.
20 वर्षांनंतर ही रक्कम वाढून 14.11 लाख रुपये होईल. सेवानिवृत्तीच्या वेळी म्हणजेच 40 वर्षांनंतर पीएफ खात्यात 86 लाख रुपयांहून अधिक जमा होतील. पण तुम्ही नोकरी बदलल्याबरोबर पीएफचे पैसे काढले, तर निवृत्तीच्या वेळी तुमचा हात रिकामाच राहील. त्यामुळे नोकऱ्या बदलताना पीएफचे पैसे काढण्याऐवजी ते ट्रान्सफर करणे फायदेशीर आहे. तुम्ही सर्व पीएफ खाती एका UAN अंतर्गत सहजपणे विलीन करू शकता. ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे.
PF अकाउंट मर्ज करण्याची सोपी प्रोसेस...
– EPFO च्या पोर्टलवर आपला UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग-इन करा.
– लॉग इन केल्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसमध्ये ’One Member – One EPF Account (Transfer Request)’ वर क्लिक करा.
– आपली पर्सनल डिटेल्स आणि करंट एम्प्लॉयरच्या पीएफ अकाउंटला व्हेरिफाय करा.
– यानंतर तुम्ही गेट डिटेल्सवर क्लिक करा, तुमच्या जुन्या एम्प्लॉयर्सची लिस्ट ओपन होईल.
– इथे तुम्ही ज्या अकाउंटमध्ये पैसे ट्रांसफर करायचे आहे, त्यावर क्लिक करा.
– यानंतर गेट ओटीपीवर क्लिक करा, तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर OTP येईल, तो टाकून सबमिट बटनवर क्लिक करा.