Join us

कागदपत्रांशिवाय पीएफमधून काढता येणार ५ लाख रुपये; 'या' कारणांसाठी मिळणार ऑटो क्लेमची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 10:44 IST

EPFO Rule Change : यापूर्वी पीएफ खात्यातून ऑटो क्लेम फक्त आजारपण आणि हॉस्पिटलच्या खर्चासाठी उपलब्ध होताय पण आता नियम बदलून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने लग्न, शिक्षण आणि घर खरेदीसाठीही पीएफ ऑटो क्लेमची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

EPFO Rule Change : तुमच्या पगारातून दर महिन्याला पीएफ फंडात पैसे जमा होत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील ७.५ कोटी सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. आपात्कालीन परिस्थितीत पीएफ काढण्यासाठी अनेक कागपत्रे जमा करावी लागत होती. मात्र, ही सुविधा सुलभ करण्यासाठी ईपीएफओने नियमात बदल केले आहे. आता पीएफ काढण्यासाठी ऑटो सेटलमेंट मर्यादा ५ लाख रुपये करण्यात आली आहे. जी आतापर्यंत १ लाख रुपये होती. म्हणजेच आता पीएफ खातेदार कोणत्याही कागदपत्रांशिवाय इतकी रक्कम काढू शकणार आहेत.

यासोबतच आतापर्यंत १० दिवस लागणाऱ्या क्लेम सेटलमेंट फक्त ३-४ दिवसात पूर्ण होणार आहे. याशिवाय, ईपीएफओ​​ने लग्न, शिक्षण आणि घर खरेदीसाठी पीएफ ऑटो-क्लेम सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, पीएफ खात्यातून केवळ आजार आणि रुग्णालयाच्या खर्चासाठी ऑटो-क्लेम सुविधा उपलब्ध होती.

वृत्तानुसार, श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगरमध्ये झालेल्या सीबीटीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, ईपीएफओ ​​सदस्य आता या वर्षी मे किंवा जूनच्या अखेरीस UPI (UPI PF Withdraw) आणि ATM (ATM PF Withdrawl) द्वारे PF काढू शकतात.

कितीवेळा मर्यादा वाढवली?ईपीएफओ​​ने एप्रिल २०२० मध्ये आपल्या सदस्यांना ऑटो-क्लेम सुविधा देण्यास सुरुवात केली, जी सुरुवातीला फक्त ५०,००० रुपयांपर्यंत मर्यादित होती. यानंतर, मे २०२४ मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ ऑटो क्लेमची मर्यादा ५० हजार रुपयांवरून १ लाख रुपये करण्यात आली. आता ही मर्यादा वाढवून ५ लाखांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

दावा नाकारण्याचे प्रमाण देखील कमीबैठकीत माहिती देताना असेही सांगण्यात आले की पीएफ क्लेम रिजेक्शन रेटमध्ये सातत्याने घट होत आहे. पूर्वी जिथे जवळपास ५० टक्के दावे फेटाळले जायचे, आता त्यांची संख्या केवळ ३० टक्क्यांवर आली आहे. नियम सुलभ करण्यासाठी EPFO ​​कडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे.

वाचा - 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार सर्वाधिक वाढ; सरासरी किती वाढ होईल?

UPI सुविधेद्वारे ऑटो क्लेमची सुलभताअलीकडेच सचिव डावरा यांनी माहिती दिली होती की लवकरच EPFO ​​सदस्यांना ATM तसेच UPI द्वारे PF पैसे काढण्याची सुविधा मिळू शकेल. या सुविधेमुळे कर्मचारी फक्त शिल्लक नाही तर पैसेही काढू शकणार आहेत. यासोबतच त्यांना त्यांच्या आवडत्या बँकेत पीएफचे पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधाही मिळणार आहे. डावरा यांनी असेही म्हटले होते की नवीन सुविधेअंतर्गत दावे आधीच स्वयंचलित असतील.

टॅग्स :ईपीएफओगुंतवणूकनोकरी