Lokmat Money >गुंतवणूक > EPFO:... तर अडकू शकतात तुमचे PF चे पैसे, अधी अपडेट करा 'ही' डॉक्युमेंट्स

EPFO:... तर अडकू शकतात तुमचे PF चे पैसे, अधी अपडेट करा 'ही' डॉक्युमेंट्स

 तुम्हाला तुमच्या EPFO ​​मध्ये दिलेली माहिती अपडेट करायची आहे का? हे काम लवकरात लवकर करा कारण चुकीच्या माहितीमुळे तुमचे पीएफचे पैसे अडकू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 03:41 PM2024-03-12T15:41:11+5:302024-03-12T15:43:25+5:30

 तुम्हाला तुमच्या EPFO ​​मध्ये दिलेली माहिती अपडेट करायची आहे का? हे काम लवकरात लवकर करा कारण चुकीच्या माहितीमुळे तुमचे पीएफचे पैसे अडकू शकतात.

EPFO your PF money may get stuck update important documents as early as possible | EPFO:... तर अडकू शकतात तुमचे PF चे पैसे, अधी अपडेट करा 'ही' डॉक्युमेंट्स

EPFO:... तर अडकू शकतात तुमचे PF चे पैसे, अधी अपडेट करा 'ही' डॉक्युमेंट्स

 तुम्हाला तुमच्या EPFO ​​मध्ये दिलेली माहिती अपडेट करायची आहे का? हे काम लवकरात लवकर करा कारण चुकीच्या माहितीमुळे तुमचे पीएफचे पैसे अडकू शकतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) सदस्य आणि नियोक्ते यांच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) प्रोफाइलमधील चुका सुधारण्यासाठी जॉईंट डिक्लेरेशनसाठी यादी बदलली आहे. तुमची UAN प्रोफाइल अपडेट करण्यासाठी ही कागदपत्रं द्यावी लागतील. ईपीएफओच्या ११ मार्च २०२४ च्या एसओपी सुधारित अधिसूचनेनुसार, अर्जदार आता सदस्याच्या वडिलांच्या/आईच्या नावाचं आधार कार्ड, पॅन कार्ड, वडिलांच्या/आईचं नाव असलेली १० वी किंवा १२ वीची मार्कशीट आणि ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज करताना सबमिट करू शकतो.

आई, वडिलांच्या नावातील चूक दुरुस्त करण्यासाठी डॉक्युमेंट्स

  • आई / वडिलांचा पासपोर्ट
  • रेशन कार्ड / पीडीएस कार्ड
  • केंद्र / राज्य सरकारद्वारे जारी फोटोसह सीजीएचएस/मेडी-क्लेम कार्ड/पीएसयू कार्ड
  • पेन्शन कार्ड
  • महानगरपालिका आणि इतर अधिसूचित स्थानिक स्वराज्य संस्था जसे की तालुका, तहसील इ. द्वारे जारी केलेलं जन्म प्रमाणपत्र.
  • सरकारने जारी केलेलं विवाह प्रमाणपत्र
  • केंद्र/राज्य सरकारनं जारी केलेलं फोटो ओळखपत्र. राज्य सरकार जसे जन आधार, मनरेगा, आर्मी कॅन्टीन कार्ड इ.
     

जन्मतारखेत दुरुस्तीसाठी डॉक्युमेंट्स

  • जन्म प्रमाणपत्र
  • मान्यताप्राप्त सरकारी बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीची मार्कशीट, स्कूल लिविंग किंवा स्कूल ट्रान्सफर प्रमाणपत्र.
  • केंद्र / राज्य सरकारच्या सेवा रेकॉर्डवर आधारित प्रमाणपत्र
  • जन्मतारीखेचा पुरावा नसल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट
  • पॅन कार्ड
  • केंद्र / राज्य शासनाची पेन्शन ऑर्डर
  • केंद्र / राज्य / केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारनं जारी केलेले CGHS/ECHS/मेडी-क्लेम कार्ड.
  • सरकारने जारी केलेले रहिवासी प्रमाणपत्र
     

नाव आणि लिंग दुरुस्त करण्यासाठी कागदपत्र

  •  आधार (अनिवार्य)
  • पासपोर्ट
  • जन्म प्रमाणपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • केंद्र सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश सरकारनं जारी केलेलं सेवा फोटो ओळखपत्र.
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (SLC)/स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC)/SSC बोर्ड / विद्यापीठानं जारी केलेले प्रमाणपत्र / मार्कशीट.
  • नाव आणि फोटो क्रॉस केलेले बँक पास बुक.
     

वैवाहिक स्थिती अपडेट करायची असल्यास
 

  • सरकारनं जारी केलेलं विवाह प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • घटस्फोट झाला असल्यास त्याची कागदपत्रं
  • पासपोर्ट

Web Title: EPFO your PF money may get stuck update important documents as early as possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.