Join us

EPFO चा प्रत्येक तिसरा क्लेम होत नाहीये क्लिअर! अखेर का होतायत PF क्लेम रिजेक्ट?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 4:13 PM

तुम्ही EPFO ​​मध्ये फाईल केलेला क्लेम मिळाला नाही का? सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) प्राप्त होणारा प्रत्येक तिसरा क्लेम नाकारत असल्याचं दिसून येत आहे.

तुम्ही EPFO ​​मध्ये फाईल केलेला क्लेम मिळाला नाही का? सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) प्राप्त होणारा प्रत्येक तिसरा क्लेम नाकारत असल्याचं दिसून येत आहे. ईपीएफओच्या अधिकृत ई-हँडलवर क्लेम सेटलमेंटसाठी होत असलेल्या विलंबाबाबत अनेक ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या आहेत. क्लेम न मिळाल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पेन्शन बॉडीनं माहिती दिली. संबंधित ईपीएफओ कार्यालयात क्लेम सादर केल्यास, तो निकाली काढण्यासाठी किंवा पीएफची रक्कम देण्यासाठी साधारणपणे 20 दिवस लागतात. 

ईपीएफओ 277 मिलियनपेक्षा अधिक अकाऊंट आणि जवळपास 20 लाख कोटींच्या फंडसह जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा संघटना आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या अखेरच्या क्लेम सेंटलमेंटच्या 73.78 लाख दाव्यांपैकी 33.8 (जवळपास 24.93 लाख) दावे नाकारण्यात आले. तर अधिकृत आकडेवारीवरून 46.66 लाख क्लेम्स सेटल करण्यात आले आणि 2.18 लाख क्लोजिंग बॅलन्स म्हणून दाखवण्यात आले. 

हे 2017-18 आणि 2018-19 मधील क्लेम नाकारण्याच्या दरापेक्षा खूप जास्त होते, जेव्हा ते अनुक्रमे 13 टक्के आणि 18.2 टक्के होते. क्लेमच्या एकूण अर्जांपैकी नाकारण्यात आलेल्या क्लेमची टक्केवारी 2019-20 मध्ये 24.1 टक्के आणि 2020-21 मध्ये 30.8 टक्के होती. 2021-22 मध्ये हा डेटा अधिक होता. त्यानंतर 35.2 टक्के क्लेम फेटाळण्यात आले. म्हणजेच, फेटाळलेल्या क्लेमची टक्केवारी एकूण क्लेम्सच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त होती. गेल्या पाच वर्षांत फेटाळलेल्या दाव्यांची टक्केवारी वाढली आहे. तथापि, 2021-21 ते 2022-23 पर्यंत थोडीशी घट झाली आहे. 

ऑनलाइन क्लेममध्ये समस्या 

ईपीएफओ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ऑनलाइन प्रक्रिया पीएफचे क्लेम जलद नाकारण्याचे मुख्य कारण आहे. यापूर्वी कागदपत्रांची नियोक्ता किंवा कंपनीकडून पडताळणी केली जात होती, त्यानंतर कागदपत्रे ईपीएफओकडे येत होती. पण, आता पीएफ खाती आधार क्रमांकाशी ऑनलाइन लिंक करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत 99 टक्के दावे ऑनलाइन पोर्टलद्वारे केले जात आहेत. अर्जदार ऑनलाइन अर्जात काही चुका करतात आणि त्यांचा क्लेम नाकारला जातो.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधी