Lokmat Money >गुंतवणूक > सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत

Gold Silver Rate Today : नुकतीच सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. परंतु आता दिवाळी - धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. आजही सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झालाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 03:09 PM2024-10-07T15:09:58+5:302024-10-07T15:11:18+5:30

Gold Silver Rate Today : नुकतीच सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. परंतु आता दिवाळी - धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. आजही सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झालाय.

Fall in gold and silver prices See today s gold price from 14 carat to 24 carat price diwali dhanteras navratri festival | सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत

Gold Silver Price 7 October: नुकतीच सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. परंतु आता दिवाळी - धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. आजही सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झालाय. चांदीचा भाव आज ५१६ रुपयांनी घसरून ९१६८४ रुपये प्रति किलो ग्रॅम झाला. आयबीजेएच्या दरानुसार आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ३७८ रुपयांनी कमी होऊन ७६५८६ रुपये झालाय. सोनं आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस यांचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर किती?

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ३७७ रुपयांनी कमी होऊन ७५२८३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा भाव २२५ रुपयांनी कमी होऊन ६९२८३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव २८३ रुपयांनी कमी झाला असून तो ५६६९० रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव २२१ रुपयांनी कमी होऊन ४४२१८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

जीएसटीसह सोन्या-चांदीचे दर

जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ७७,८५३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. यामध्ये २२६७ रुपये जीएसटी जोडण्यात आले आहेत. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७७५४१ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार यात २२५८ रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचं झालं तर आज जीएसटीसह त्याची किंमत ७१३६१ रुपयांवर पोहोचली आहे. यात जीएसटी म्हणून २०७८ रुपयांची भर पडली आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव आता १७०० रुपयांच्या जीएसटीसह ५८३९० रुपये झाला आहे. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा यांचा समावेश नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ९४४३४ रुपयांवर पोहोचलाय.

Web Title: Fall in gold and silver prices See today s gold price from 14 carat to 24 carat price diwali dhanteras navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.