Join us  

या सरकारी बँकांमध्ये FD केल्यास मिळेल 7 टक्क्यांहून अधिक व्याज, जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 5:45 PM

आज आम्ही आपल्याल अशाच 4 सरकारी क्षेत्रातील बँकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या आपल्या ग्राहकांना 7% पेक्षाही अधिक व्याज देत आहेत.

देशातील अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात नुकतीच वाढ केली आहे. यामुळे सध्या, एफडीमध्ये पैसे गुंतवणे हा एक चांगला निर्णय ठरू शकतो. आपण FD मध्ये निश्चित कालावधीसाठी आणि निश्चित व्याजदराने पैसे गुंतवून योग्य परतावा मिळवू शकता. गेल्या काही दिवसांत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), बँक ऑफ इंडिया (Bank of India), कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियासारख्या (Union Bank of India) बँकांनी आपापल्या एफडी दरात वाढ केली आहे. आज आम्ही आपल्याल अशाच 4 सरकारी क्षेत्रातील बँकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या आपल्या ग्राहकांना 7% पेक्षाही अधिक व्याज देत आहेत.

Bank of Baroda -बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) ‘Baroda Tiranga Plus Deposit Scheme’ नावाने 399 दिवसांची स्पेशल एफडी स्कीम सुरू केली आहे. या स्पेशल एफडी स्कीमअंतर्गत कॉलेबल डिपॉजिटवर बँक आपल्यासामान्य ग्राहकांना 6.75 टक्के तर सिनियर सिटीझन ग्राहकांना 7.25 टक्के व्याज देत आहे. तसेच बँक नॉन–कॉलेबल डिपॉझिटवर आपल्या सामान्य ग्राहकांना 7 टक्के आणि सिनियर सिटीझन ग्राहकांना 7.50 टक्के व्याज देत आहे.

Bank of India देतेय 7.75 टक्के व्याज -बँक ऑफ इंडियाने (Bank of India) लिमिटेड टाइमसाठी स्पेशल फिक्स्ड डिपॉजिट स्कीम ‘Star Super Triple Seven Fixed Deposit’ लॉन्च केली आहे. 777 दिवसांच्या या स्पेशल एफडी स्कीमवर बँक आपल्या  सामान्य ग्राहकांना 7.25 टक्के तसेच सिनिअर सिटीझन ग्राहकांना 7.75 टक्के व्याज देत आहे.

Union Bank of India च्या FD वर मिळणार 7 टक्के परतावा - युनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank of India) आपल्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) रेट्समध्ये वाढ केली आहे. व्याज दरांतील वाढीनंतर आता बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडी पर्यंत आता आपल्या ग्राहकांना 3 टक्के ते 7 टक्के व्याज देत आहे. ब्याज दरातील ही वाढ 599 दिवसांच्या मॅच्युरिटी पिरिअडसाठी करण्यात आली आहे.

Canara Bank 666 दिवसांच्या FD वर देणार 7.50 टक्के व्याज - केनरा बँकेने (Canara Bank) आपल्या ग्राहकांसाठी 666 दिवसांची स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट (FD) स्कीम लॉन्च केली आहे. या स्पेशल एफडी स्कीम अंतर्गत बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 7 टक्के तर सिनिअर सिटीझन ग्राहकांना 7.50 टक्के एवढे व्याज देणार आहे.

टॅग्स :बँकगुंतवणूकपैसा