FD vs SIP: सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये काही जोखीम असलेलेल तर काही सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारेही आहेत. भारतीय गुंतवणूकदार सामान्यतः मुदत ठेवींना (FD) प्राधान्य देतात. पण, गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचा कल वाढत चालला आहे. यात जोखीम असली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीत हा धोका बऱ्याचअंशी कमी होतो. अशा परिस्थितीत एफडी की एसआयपीद्वारे म्युच्युअफ फंडात गुंतवणूक करावी असा प्रश्न नेहमी विचारला जातो. चला आज याचं उत्तर जाणून घेऊ.
FD म्हणजे काय?
FD म्हणजेच मुदत ठेव ही बँक किंवा नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) मधील एकरकमी गुंतवणूक आहे. यामध्ये तुम्ही ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित रक्कम गुंतवता येते. यामध्ये निश्चित आणि सुरक्षित परतावा मिळतो. जर तुम्ही कर-बचत मुदत ठेवीमध्ये किमान ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला कर लाभ मिळू शकतात. एफडीचा हा सर्वात मोठा फायदा आहे.
SIP म्हणजे काय?
SIP म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याद्वारे तुम्हाला डेट किंवा इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये नियमित, निश्चित गुंतवणूक करू देते. नवीन गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी म्युच्युअल फंड सर्वात योग्य पर्याय आहे. यामध्ये तुम्ही एकरकमी आणि एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता. ते गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध आणि वेळेवर बचत करण्याची सवय विकसित करण्यास मदत करतात. यात जोखीम असली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीत ती कमी होते.
कोणत्या योजनेत गुंतवणूक करणे शहाणपणाचे
- एफडी किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचा गुंतवणूक करण्याचा उद्देश काय आहे? हे माहीत असणे आवश्यक आहे. एफडी हे गुंतवणूक साधन आहे तर SIP ही गुंतवणूक प्रक्रिया आहे. SIP ही समान भागांमध्ये आणि नियमित अंतराने केलेली गुंतवणूक आहे. FD आणि SIP या दोन्हींची स्वतःची खास वैशिष्ट्ये आणि फायदे आहेत. तुमच्या गुंतवणुकीच्या गरजेनुसार तुम्ही सर्वोत्तम पर्याय निवडू शकता.
- जर तुमची जोखीम उचलण्याची क्षमता नसेल किंवा तुम्हाला जोखीम घ्यायची नाही, अशात तुम्ही FD ची निवड करू शकता. पण, तुम्हाला उच्च परतावा हवा असेल आणि तुमच्या गुंतवणुकीवर मध्यम ते उच्च जोखीम घेण्यास तयार असाल तर तुम्ही SIP चा पर्याय निवडू शकता.
- जर तुम्हाला एकरकमी पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला नियमित अंतराने लहान रक्कम गुंतवायची असेल आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची नसेल तर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करू शकता.
- जर तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट भांडवल संरक्षण असेल आणि तुम्हाला जास्त परताव्याची अपेक्षा नसेल, तर तुमच्यासाठी FD हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय असू शकतो. जर तुम्हाला उद्देश ठेवून गुंतवणूक करायची असेल जेणेकरून तुम्हाला उच्च परतावा मिळू शकेल, तर SIP हा तुमच्यासाठी चांगला गुंतवणूक पर्याय आहे.