Join us

FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या

By जयदीप दाभोळकर | Updated: April 19, 2025 14:20 IST

FD vs SIP: हल्ली गुंतवणूकीच्या बाबतील लोक सतर्क झालेत. जर पैसे वाढवायचे असतील तर अभ्यास करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक आहे.

FD vs SIP: हल्ली गुंतवणूकीच्या बाबतील लोक सतर्क झालेत. जर पैसे वाढवायचे असतील तर अभ्यास करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आपण अनेकवेळा पैशाची बचत करण्यासाठी वेगवेगळ्या स्किममध्ये पैसे गुंतवत असतो. काहीजण एफडीमध्ये गुंतवणूक करत असतात, तर काहीजण एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असतात. बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यात SIP आणि FD या दोन्ही योजना फायद्याच्या आहेत. या दोन्हीमध्ये कोणती योजना फायद्याची आहे ते आपण पाहूया.

एसआयपी, एफडीमध्ये फरक काय?

एसआयपी ही एक गुंतवणूक योजना आहे, यामध्ये तुम्ही ठराविक रक्कम नियमितपणे म्युच्युअल फंडात गुंतवता येते. ही एक शिस्तबद्ध पद्धत आहे, यामध्ये तुम्ही दरमहा ठराविक रक्कम गुंतवू शकता. SIP मध्ये नियमितपणे गुंतवणूक केल्याने तुम्हाला चांगला परतावा मिळतो. विशेषतः जेव्हा तुम्ही त्यात दीर्घकालीन गुंतवणूक करता. याशिवाय तुम्ही छोट्या गुंतवणुकीसह SIP देखील सुरू करू शकता. म्हणजे तुम्ही फक्त ५०० रुपयांनी एसआयपी सुरू करू शकता.

एका शेअरवर ₹११७ चा डिविडेंड देतेय कंपनी, रेकॉर्ड डेट आता जास्त दूर नाही; पाहा कोणता आहे शेअर?

SIP पूर्णपणे शेअर बाजारावर अवलंबून असते. जर बाजार घसरला तर तुमच्या गुंतवणुकीचं मूल्य कमी होऊ शकतं. जर तुम्हाला अल्पावधीत चांगले पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला एसआयपीचा फारसा फायदा होणार नाही. FD म्हणजेच मुदत ठेव, हा एक पारंपारिक आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. यामध्ये तुम्ही बँकेत ठराविक रक्कम जमा करता आणि त्यावर तुम्हाला निश्चित व्याजदर मिळतं. एफडी गुंतवणूक जोखीममुक्त असते आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतात.

म्हणजेच, एसआयपीच्या विपरीत, त्याचा बाजारातील चढउतारांचा परिणाम होत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे FD मधील व्याजदर आगाऊ ठरवला जातो आणि तो संपूर्ण कालावधीत स्थिर राहतो. म्हणजे तुमच्या परताव्यात कोणताही बदल नाही आणि तुम्हाला ते नेहमी मिळतात. याशिवाय, तुम्ही स्वतः FD ची कालमर्यादा ठरवू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवड करू शकता. हा कालावधी काही महिन्यांपासून काही वर्षांपर्यंत असू शकतो.

तोटा काय?

एफडीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यावर मिळणारा परतावा. हा परतावा मर्यादित आहे. शेअर बाजार किंवा इतर गुंतवणूक योजनांच्या तुलनेत एफडीचा परतावा खूपच कमी असतो. FD मध्ये चक्रवाढीचा फायदा मर्यादित आहे, जेव्हा तुम्ही मासिक किंवा वार्षिक व्याज काढता तेव्हा हा आकडा लक्षात येईल. याशिवाय, एफडीमध्ये गुंतवलेली रक्कम निर्धारित कालावधीपूर्वी काढल्यास दंड भरावा लागेल. तर, एसआयपीमध्ये असे काहीही नाही. गुंतवणुकीचे दोन्ही पर्याय समजून घेतल्यानंतर, आता तुम्ही कुठे गुंतवणूक करावी हा तुमचा निर्णय आहे. 

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूक