Lokmat Money >गुंतवणूक > SBI च्या विशेष योजनेचा फायदा घेण्यासाठी उरलेत काही दिवस, मिळतंय मोठं व्याज

SBI च्या विशेष योजनेचा फायदा घेण्यासाठी उरलेत काही दिवस, मिळतंय मोठं व्याज

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी निरनिराळ्या स्कीम्स ऑफर करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 03:42 PM2023-09-04T15:42:27+5:302023-09-04T15:42:50+5:30

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी निरनिराळ्या स्कीम्स ऑफर करत आहे.

Few days left to take advantage of SBI s special fixed deposit scheme getting huge interest details | SBI च्या विशेष योजनेचा फायदा घेण्यासाठी उरलेत काही दिवस, मिळतंय मोठं व्याज

SBI च्या विशेष योजनेचा फायदा घेण्यासाठी उरलेत काही दिवस, मिळतंय मोठं व्याज

SBI WeCare FD Scheme: भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी निरनिराळ्या स्कीम्स ऑफर करत आहे. यापैकी एक उत्तम स्कीम म्हणजे SBI WeCare एफडी स्कीम. यामध्ये गुंतवणूक करण्यास अखेरचे काही दिवस उरले असून ३० सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करण्याची यात संधी आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्कीम ५ ते १० वर्षांच्या कालावधीसाठी ऑफर केली जात आहे. ही स्कीम २०२० मध्ये सुरू करण्यात आली होती.

बँक ज्येष्ठ नागिरकांना कोणत्याही एफडीवर सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ०.५० टक्के अधिक व्याज देते. एसबीआय व्हीकेअरमध्ये ग्राहकांना ७.५० टक्क्यांचं व्याज मिळत आहे. या योजनेत सामान्य एफडीच्या तुलनेत ०.३० टक्क्यांचं अधिक व्याज मिळतं. या स्कीमचा लाभ घेतल्यास ग्राहकांना त्यावर कर्जाची सुविधाही मिळू शकते. या एफडी अंतर्गत किमान ५ आणि कमाल १० वर्षांसाठी गुंतवणूक करता येऊ शकते. नव्या आणि रिन्यू होणाऱ्या एफडींसाठी हे नवे दर लागू होतील. ३० सप्टेंबर २०२३ ही या स्कीमची अखेरची तारीख आहे.

ICICI बँकही देतेय ऑफर
खासगी क्षेत्रातील मोठ्या बँकांपैकी एक आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांसाठी ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी गोल्डन इयर एफडी ऑफर करत आहे. या खास एफडीमध्ये ग्राहकांना ०.५० टक्के प्रीमिअमच्या वर ०.१० टक्के अतिरिक्त प्रीमिअमचा फायदा मिळतो. या अंतर्गत ग्राहकांना ७.७० टक्क्यांचं व्याज दिलं जात आहे.

Web Title: Few days left to take advantage of SBI s special fixed deposit scheme getting huge interest details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.