Lokmat Money >गुंतवणूक > Financial Planning : नव्या वर्षात 'या' ५ गोष्टींकडे आवर्जून द्या लक्ष, आयुष्यभर साथ सोडणार नाही पैसा  

Financial Planning : नव्या वर्षात 'या' ५ गोष्टींकडे आवर्जून द्या लक्ष, आयुष्यभर साथ सोडणार नाही पैसा  

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक नियोजनासाठी ही सर्वोत्तम संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 12:45 PM2023-12-26T12:45:42+5:302023-12-26T12:48:19+5:30

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक नियोजनासाठी ही सर्वोत्तम संधी आहे.

Financial Planning 2024 Pay attention to these 5 things in the new year will not face financial problems tips and tricks investment | Financial Planning : नव्या वर्षात 'या' ५ गोष्टींकडे आवर्जून द्या लक्ष, आयुष्यभर साथ सोडणार नाही पैसा  

Financial Planning : नव्या वर्षात 'या' ५ गोष्टींकडे आवर्जून द्या लक्ष, आयुष्यभर साथ सोडणार नाही पैसा  

Financial Planning for 2024: नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक नियोजनासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. पैशांची कधीही चिंता करावी लागू नये असं आपल्याला कायमच वाटत असतं. पण यासाठी नियोजनही तितकंच आवश्यक असतं. आयुष्यभर पैशांची चिंता करावी लागणार नाही, असं काही नियोजन करता येऊ शकतं का? आपला खर्च, बचत आणि गुंतवणुकीच्या सवयी आपण किती पैसे वाचवू शकतो हे ठरवतात. अशा ५ गोष्टी आहेत ज्या केल्या तर तुम्हाला आयुष्यभर आर्थिक सुरक्षितता मिळेल.

तुमचा कॅश फ्लो
ही एक अतिशय मूलभूत गोष्ट आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं उत्पन्न आणि तुमचा खर्च ट्रॅक करता आला पाहिजे. पैसे कुठे जात आहेत आणि किती येत आहेत हे जेव्हा तुम्हाला कळते, तेव्हा तुम्ही त्याचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करू शकता. काही अनावश्यक खर्च असल्यास ते टाळण्याचा प्रयत्न करा. जिथे पैसे वाचू शकतात, तिथे ते वाचवण्यासही यामुळे मदत होईल.

गुंतवणुकीचे मार्ग
नवीन वर्षात गुंतवणुकीचे नवे मार्ग शोधा. तुम्ही अजूनही फक्त विचार करत असाल, तर या वर्षी गुंतवणुकीद्वारे तुमचे पैसे वाढवण्याचे मार्ग शोधा. छोट्या रकमेपासून आणि सुरक्षित गुंतवणुकीपासून सुरुवात करा. गुंतवणूक ही संपत्ती आणि आर्थिक हमी वाढवण्याचा एक मार्ग आहे. नुसती बचतच नाही तर ती वाढणे हा योग्य मार्ग आहे.

स्मार्ट स्पेंडर
पैसे खर्च करण्याची पद्धत बदला. हार्ड स्पेंड नाही, तर स्मार्ट स्पेंड करा. तुमच्या गरजेपेक्षा कमी खर्च करून तुम्ही जास्त पैसे वाचवू शकता आणि ते वाढवू शकता. ज्यामुळे तुमच्या खिशाला मोठा फटका बसतोय, अशा गोष्टींपासून वाचून तुम्ही सुरुवात करू शकता. महागड्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासारखे पर्याय स्वीकारा. यानंतर तुम्ही हळूहळू तुमच्या खर्चाला प्राधान्य देण्यास सुरुवात कराल.

उत्पन्नाच्या संधी
तुमच्याकडे फक्त एक नाही तर दोन किंवा अनेक उत्पन्नाच्या संधी उपलब्ध असतीलतर ते चांगले होईल. शक्य असल्यास, या आर्थिक वर्षात स्वतःसाठी अनेक उत्पन्नाच्या संधी निर्माण करा. तुमचा पैसा एका प्रवाहानं प्रभावित झाला असला तरीही, तुम्हाला उत्पन्नाची सुरक्षितता असेल.

रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक
रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही तुमची सर्वात मोठी आर्थिक हमी असू शकते. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे हा फायनान्शिअल जिनिअस प्लॅन असू शकतो. तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुमचे पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवा किंवा या ध्येयानं कुठेतरी गुंतवणूक करा.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Financial Planning 2024 Pay attention to these 5 things in the new year will not face financial problems tips and tricks investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.