कॉलेज हा आयुष्याचा असा सुरूवातीचा टप्पा असतो, जेव्हा विद्यार्थी त्यांच्या बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च करू लागतात. त्यांच्या मासिक खर्चासाठी जे पैसे दिले जातात, बहुतेकदा त्याच्यापेक्षाही जास्त खर्च केला जातो आणि पुन्हा घरून पैसे मागवे लागतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा पैसे उधार घेण्यासही मुलं मागेपुढे पाहत नाहीत. पण हे भविष्यासाठी घातक ठरू शकते. कॉलेज स्टुडंस्ट्स आपली आर्थिक स्थिती कशी मजबूत करू शकतात हे पाहू.
खर्च बजेटमध्ये करा
सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे. कारण बजेटमध्ये खर्च केल्यानं केवळ वैयक्तिक आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत नाही तर आवश्यक त्या काळासाठी पैशांची बचत करण्यातही मदत होते. याच्या मदतीने तुम्ही बजेट तयार करू शकता. ज्यामध्ये तुम्ही महिन्याच्या शेवटी तुम्हाला मिळालेले पैसे आणि तुमच्या खर्चाची यादी बनवून त्याचं अॅनालिसिस करू शकता.
खर्चावर नियंत्रण
विद्यार्थ्यांनी नेहमी अतिरिक्त खर्चाकडे लक्ष दिलं पाहिजे. इतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रभावाखाली, अनेक वेळा ते त्यांच्या बजेटची मर्यादा ओलांडतात. परंतु त्यांनी तसं करणं टाळावं. काही अनावश्यक खर्च थांबवून आपल्या जीवनावश्यक गोष्टींवर खर्च करावा.
ऑटो बिल पेमेंट
तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुम्ही बिल पेमेंटसाठी ऑटो बिल पेमेंट मोड चालू करू शकता. याद्वारे, तुम्ही लेट फी आणि अतिरिक्त शुल्क टाळू शकता. यासोबतच क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर कॅशबॅक आणि डिस्काउंट सारख्या सुविधाही उपलब्ध असतात, ज्यामुळे बचत सहज करता येते. परंतु याचा वापरही मर्यादेतच करायला हवा.
स्टुडंट डिस्काऊंट
मार्केटमध्ये अशा अनेक सेवा आहेत ज्यात विद्यार्थ्यांना विशेष सवलत दिली जाते. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना प्रवास तिकीट सवलत, ओटीटी सबस्क्रिप्शन, डायनिंग आऊट, पुस्तके इत्यादींवर विशेष सवलत मिळते. अशा सवलतींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शोध घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सवलतीतून वाचलेल्या पैशामुळे तुम्ही अधिक बचत करू शकाल.