Join us  

पहिले 'विला' आता 'हवेली', मुकेश अंबानींनी दुबईत पुन्हा खरेदी केले महागडे घर; किंमत तब्बल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 8:27 PM

मुकेश अंबानी यांची ही दुबईतील दुसरी प्रॉपर्टी आहे.

Mukesh Ambani New home: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी दुबईमध्ये आतापर्यंतची सर्वात महागडी मालमत्ता खरेदी केली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांनी गेल्या आठवड्यात कुवेती टायकून मोहम्मद अलशाया यांच्या कुटुंबाकडून सुमारे 163 दशलक्ष डॉलर्समध्ये पाम जुमेराह हवेली खरेदी केली आहे.

दुबईच्या भूमी विभागाने खरेदीदाराची ओळख उघड न करता कराराचा तपशील दिला. रिलायन्स आणि अलशायाच्या प्रतिनिधींकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, कुवेतचे दिग्गज उद्योगपती अलशाया ग्रुपकडे स्‍टारबक्‍स, एचअँडएम आणि व्हिक्‍टोरियाज सिक्रेटसह अनेक रिटेल ब्रँडच्‍या स्‍थानिक फ्रँचायझी आहेत. तर, मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आहेत.

दुबईतील दुसरा करारया वर्षाच्या सुरुवातीला मुकेश अंबानी यांनी दुबईत $80 दशलक्ष मध्ये विला खरेदी केला होता. त्या विलापासून काही अंतरावरच ही हवेली आहे. विशेष म्हणजे, रिलायन्सने प्रतिष्ठित यूके कंट्री क्लब स्टोक पार्क विकत घेण्यासाठी गेल्या वर्षी $79 दशलक्ष खर्च केले होते. मुकेश अंबानी न्यूयॉर्कमध्येही प्रॉपर्टीच्या शोधात आहेत.

टॅग्स :मुकेश अंबानीदुबई