Lokmat Money >गुंतवणूक > Fixed Deposit : पैशांची गरज आहे? FD तोडू नका; तुम्हालाही मिळेल कर्ज, कसा कराल अर्ज?

Fixed Deposit : पैशांची गरज आहे? FD तोडू नका; तुम्हालाही मिळेल कर्ज, कसा कराल अर्ज?

जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल तर एफडी तोडून पैसे जमा करू नका. एफडीच्या सुविधांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 08:16 PM2023-05-04T20:16:03+5:302023-05-04T20:16:27+5:30

जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल तर एफडी तोडून पैसे जमा करू नका. एफडीच्या सुविधांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा.

Fixed Deposit Need money in emergency Do not break the FD You can also get a loan how to apply know details investment | Fixed Deposit : पैशांची गरज आहे? FD तोडू नका; तुम्हालाही मिळेल कर्ज, कसा कराल अर्ज?

Fixed Deposit : पैशांची गरज आहे? FD तोडू नका; तुम्हालाही मिळेल कर्ज, कसा कराल अर्ज?

तुम्ही बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये रक्कम गुंतवली असेल, तर तुमच्यासाठी हा एक अतिशय फायदेशीर सौदा ठरू शकतो. हे पैसे बँकेत जमा असतील तर त्यावर व्याज मिळणारच आहे. त्याच वेळी, आपत्कालीन परिस्थितीत, तुम्ही एफडी न मोडताही कर्ज घेऊ शकता. कठीण काळात ही एफडी खूप उपयोगी पडते. बँका एफडीमध्ये जमा केलेल्या रकमेपैकी ९० टक्के ते ९५ टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. याशिवाय एफडीवर ओव्हरड्राफ्ट मर्यादेचा लाभही मिळतो. बँका तुम्हाला जमा रकमेच्या ९० टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्ट मर्यादेचा लाभ देऊ शकतात.

तुम्ही एफडीवर कर्ज घेतल्यास, या कर्जावरील व्याजाचा दर वैयक्तिक कर्जापेक्षा खूपच कमी असतो. यामध्ये तुम्ही वापरत असलेल्या रकमेवरच तुम्हाला व्याज आकारले जाईल.

प्रोसेसिंग फी नाही

एफडीवर घेतलेल्या कर्जावर एफडीच्या दरापेक्षा २ टक्के जास्त व्याज आकारलं जातं. मात्र यासाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारलं जात नाही. तसंच कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेवरच व्याज लागू होतं. जर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नसाल, तर ते कर्ज तुमच्या एफडीच्या रकमेतून कव्हर केलं जातं. एवढंच नाही तर एफडीवर अनेक प्रकारच्या सुविधाही उपलब्ध आहेत. तुम्ही ५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एफडी केल्यास, तुम्हाला इन्कम टॅक्स कायदा १९६१ च्या कलम ८०सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळू शकतो. दुसरीकडे, जर एफडी ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीची असेल तर कर भरावा लागेल.

कोण घेऊ शकतं कर्ज?

यासाठी सॅलरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही प्रकारचं बचत खातं असणं आवश्यक आहे. एफडी एका व्यक्तीची असो किंवा संयुक्त, कोणताही एफडीधारक कर्ज घेऊ शकतो. ज्याचा क्रेडिट स्कोर चांगला आहे, त्यांना कर्जही मिळू शकते. परंतु ही अनिवार्य अट नाही. तसंच कोणत्या मायनरच्या नावावर एफडी असेल तर त्याला याचा फायदा मिळणार नाही. तसंच एफडी ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी असेल तरीही कर्ज मिळणार नाही.

Web Title: Fixed Deposit Need money in emergency Do not break the FD You can also get a loan how to apply know details investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.