Forbes Neha Narkhede : पुरुषांसोबत महिलाही उद्योग क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. भारतीय महिलांचा डंका फक्त भारतातच नाही, तर जगभरात वाजत आहे. यात पुण्यातील युवा उद्योजिका नेहा नारखेडे, हिचेही नाव आहे. भारतीय वंशाच्या नेहाने जगातील सर्वात यशस्वी महिलांच्या यादीत प्रवेश केला आहे.
पुण्यात जन्मलेल्या नेहा नारखेडेने अमेरिकन आयटी क्षेत्रातात भारताचे नाव उंचावले आहे. अलीकडेच फोर्ब्सने अमेरिकेतील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिलांच्या यादीत नेहाला स्थान दिले आहे. नेहाची एकूण संपत्ती 520 मिलियन डॉलर्स म्हणजे सूमारे 42 हजार कोटी रुपये आहे. नेहा क्लाउड सेवा पुरवणाऱ्या कॉन्फ्लुएंटची सहसंस्थापक आहे.
कोण आहे नेहा नारखेडे?नेहा नारखेडे पुण्यात लहानाची मोठी झाली. नेहाने पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी कॉलेज, पीआयसीटीआरमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. नंतर 2006 साली ती जॉर्जिया टेक येथे कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी परदेशी गेली. तिने सुरुवातीला ओरॅकल आणि नंतर लिंक्डइन येथे सॉफ्टवेअर अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. नंतर त्यांनी कॉन्फ्लुएंट या कंपनीची स्थापना केली.