Lokmat Money >गुंतवणूक > अबुधाबी, श्रीलंका अन् टांझानिया...सर्वांचा गौतम अदानींवर विश्वास, गुंतवणूक सुरुच राहणार

अबुधाबी, श्रीलंका अन् टांझानिया...सर्वांचा गौतम अदानींवर विश्वास, गुंतवणूक सुरुच राहणार

उद्योगपती गौतम अदानी गेल्या काही काळापासून अडचणीत आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 08:12 PM2024-11-28T20:12:58+5:302024-11-28T20:14:41+5:30

उद्योगपती गौतम अदानी गेल्या काही काळापासून अडचणीत आले आहेत.

From Abu Dhabi to Sri Lanka and Tanzania...all trust in Adani | अबुधाबी, श्रीलंका अन् टांझानिया...सर्वांचा गौतम अदानींवर विश्वास, गुंतवणूक सुरुच राहणार

अबुधाबी, श्रीलंका अन् टांझानिया...सर्वांचा गौतम अदानींवर विश्वास, गुंतवणूक सुरुच राहणार

Adani Group News: उद्योगपती गौतम अदानी गेल्या काही काळापासून अडचणीत आले आहेत. पण, गुरुवारचा दिवस अदानी समूहासाठी दुतर्फा आनंद घेऊन आला. एकीकडे शेअर बाजारात घसरण सुरू असताना अदानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ झाली. अमेरिकेच्या आरोपानंतरही अबुधाबीपासून ते टांझानियापर्यंतच्या सरकारांनी गौतम अदानींच्या कंपन्यांवर विश्वास व्यक्त केला आहे.

अबुधाबीच्या इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने (IHC) अदानी समूहाला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेत आरोप असूनही, समूहातील गुंतवणुकीबाबत आमचा दृष्टिकोन बदललेला नसल्याचे IHC ने म्हटले आहे. दरम्यान, श्रीलंका बंदर प्राधिकरण आणि टांझानिया सरकारनेही अदानी समूहाला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

अबुधाबी कंपनीने विश्वास व्यक्त केला
अदाणी समूहच्या प्रमुख परदेशी गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या आयएचसीने एका निवेदनात म्हटले की,  अदानी समूहासोबतची आमची भागीदारी ग्रीन एनर्जी आणि रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातील त्यांच्या योगदानावरील आमचा विश्वास दर्शवते. दरम्यान, आयएचसीने एप्रिल 2022 मध्ये अदानी समूहाची रिन्युएबल एनर्जी कंपनी अदानी ग्रीन एनर्जी ली. आणि वीज कंपनी अदानी ट्रान्समिशनमध्ये सूमारे 50 कोटी अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली होती. याशिवाय, अदानी एंटरप्रायजेजमध्येही 1 अब्ज डॉलरसी गुंतवणूक केली आहे. पण, पुढे त्यांनी एजीईएलमधील आपली 1.26 टक्के आणि एटीएलमधील 1.41 टक्के हिस्सेदारी विकली. तर, अदानी एंटरप्रायजेज लिमिटेडमधील आपला हिस्सा वाढवून 5 टक्के केला.

श्रीलंका अन् तंझानियाने काय म्हटले?
इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांनीही अदानी समूहाला पाठिंबा दर्शविला आहे. श्रीलंका बंदर प्राधिकरणाने अदानी समूहासोबतच्या भागीदारीवर विश्वास व्यक्त केला आहे. समूहाने त्यांच्या देशातील बंदर पायाभूत सुविधांच्या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोलंबो टर्मिनलमध्येही $1 अब्ज गुंतवणुकीसह हा प्रकल्प श्रीलंकेच्या बंदर क्षेत्रातील सर्वात मोठी थेट विदेशी गुंतवणूक असेल. तर, टांझानिया सरकारने अदानी बंदरांसोबत केलेल्या करारांबाबत आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे. 

Web Title: From Abu Dhabi to Sri Lanka and Tanzania...all trust in Adani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.