Gautam Adani Net Worth Update : हिंडनबर्ग रिपोर्ट आल्यापासून गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. पण, आता अदानी पुनरागमन करत असल्याचे दिसत आहे. गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशीही चांगली वाढ दिसून येत आहे. अवघ्या 270 मिनिटांत गौतम अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 40 हजार कोटी रुपयांचीच वाढ झाली आहे आणि ते जगातील टॉप 20 अब्जाधीशांच्या यादीमध्येही परतले आहेत.
गौतम अदानी टॉप 20 मध्ये परतले
गौतम अदानी यांच्या संपत्तीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ होत आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत त्यांची एकूण संपत्ती 64.3 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. तर एका दिवसापूर्वी त्यांची एकूण संपत्ती 60 अब्ज डॉलर होती. या वाढीनंतर ते आता जगातील 17वे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. याचाच अर्थ ते पुन्हा एकदा जगातील टॉप 20 अब्जाधीशांच्या यादीत आले आहेत. यापूर्वी ते 21व्या स्थानावर होते.
270 मिनिटांत 40 हजार कोटींची वाढ
शेअर बाजार सकाळी 9.15 वाजता उघडला आणि तेव्हापासून अदानींची एकूण संपत्ती वाढू लागली. सकाळी 1.45 पर्यंत गौतम अदानी यांच्या संपत्तीत 4.9 अब्ज डॉलरची वाढ झाली होती. याचा अर्थ भारतीय रुपयानुसार गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये 270 मिनिटांत 40 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते शेअर बाजार दुपारी 3.30 वाजता बंद होतो आणि तोपर्यंत त्यांच्या संपत्तीत आणखी वाढ होऊ शकते.