Lokmat Money >गुंतवणूक > गौतम अदानी IRCTC खरेदी करणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण; रेल्वेने दिले स्पष्टीकरण...

गौतम अदानी IRCTC खरेदी करणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण; रेल्वेने दिले स्पष्टीकरण...

IRCTC: सध्या सोशल मीडियावर IRCTC च्या अधिग्रहणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 03:56 PM2023-06-19T15:56:08+5:302023-06-19T15:57:31+5:30

IRCTC: सध्या सोशल मीडियावर IRCTC च्या अधिग्रहणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Gautam Adani to buy IRCTC? spark discussion on social media; clarification given by Railways | गौतम अदानी IRCTC खरेदी करणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण; रेल्वेने दिले स्पष्टीकरण...

गौतम अदानी IRCTC खरेदी करणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण; रेल्वेने दिले स्पष्टीकरण...


नवी दिल्ली : रेल्वे तिकीट बुकिंगसाठी वापरले जाणारे अॅप IRCTCची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. गौतम अदानी यांना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन किंवा आयआरसीटीसी ही सरकारी कंपनी बळकावायची आहे. यासाठी त्यांनी स्टार्क एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपच्या अधिग्रहणाची प्रक्रियादेखील सुरू केली आहे, असा आरोप होत आहे. 

नेमकं काय प्रकरण ?

अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग कंपनी स्टार्क एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 100 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा करार केला आहे. ही कंपनी ट्रेनमॅन म्हणून ओळखली जाते. ही कंपनी IRCTC चे B2C (व्यवसाय ते ग्राहक) एजंट आहे. ही बातमी प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आलाय. आयआरसीटीसीला संपवण्याचा हा कट असल्याचे अनेक युजर्सचे म्हणणे आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, आधी आयआरसीटीसीशी स्पर्धा आणि नंतर टेकओव्हर. उशिरा का होईना, अदानी ग्रुप आयआरसीटीसी ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. या चर्चेनंतर आयआरसीटीसीलाही याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले.

आयआरसीटीसीचा ताबा नाही

आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, स्टार्क एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांच्या B2C कंपन्यांपैकी एक आहे. सध्या, IRCTC कडे ट्रेनमॅनसह 27 अधिकृत B2C (व्यवसाय ते ग्राहक) भागीदार (मुख्य सेवा प्रदाते) आहेत. कंपनीचा ताबा घेतल्याने IRCTC च्या कामकाजावर परिणाम होणार नाही. सध्या IRCTC कडे 27 B2C PSPs आहेत, जे तिकीट बुक करू शकतात. यामध्ये Paytm आणि MakeMyTrip यांच्यासारख्या कंपन्यांचाही समावेश आहे.

IRCTC चा व्यवसाय किती मोठा ?

IRCTC चा व्यवसाय खूप मोठा आहे. सध्या, आयआरसीटीस्या वेबसाइटवर दररोज सरासरी 14.5 लाख तिकिटे बुक केली जातात. रेल्वेच्या एकूण आरक्षित तिकिटांपैकी हे प्रमाण 81 टक्के आहे. त्यापैकी 40.5 टक्के तिकिटे मोबाइल अॅपद्वारे तर 16.2 टक्के तिकिटे वेबसाइटवरून बुक केली जातात. त्यांचे 27 B2C प्रमुख सेवा प्रदाते 15 टक्के तिकिटे बुक करतात.

ट्रेनमॅनची काय अवस्था ?
IRCTC कडे 27 B2C PSP आहेत. ट्रेनमॅनदेखील त्यापैकीच एक आहे. पण ट्रेनमॅनचा व्यवसाय फारच कमी आहे. B2C स्टार्टअप योजनेअंतर्गत 17 ऑगस्ट 2021 रोजी ट्रेनमॅन जोडले गेले. IRCTC सोबत त्यांचा करार 16 ऑगस्ट 2024 पर्यंत वैध आहे. सध्या ट्रेनमॅन प्लॅटफॉर्मवरून दररोज सुमारे 2000 तिकिटे बुक होतात. रेल्वेच्या एकूण तिकिटांच्या हे प्रमाण केवळ 0.137 टक्के आहे.

Web Title: Gautam Adani to buy IRCTC? spark discussion on social media; clarification given by Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.