Gautam Adani News: अब्जाधीश गौतम अदानी यांची कंपनी Adani Wilmar चे इनीशिअल पब्लिक ऑफर म्हणजेच IPO गेल्या फेब्रुवारीमध्येच लाँच करण्यात आला होता. आता अदानी ग्रुप कंपनी- अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) द्वारे 20,000 कोटी रुपये उभारणार आहे.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की, IPO आणि FPO मध्ये काय फरक आहे? तर, FPO अंतर्गत आधीच सूचीबद्ध असलेली सार्वजनिक कंपनी बाजारात त्यांचे नवीन शेअर्स जारी करून निधी उभारू शकते. या FPO द्वारे अदानी 20,000 कोटी रुपये उभारणार आहेत. अधानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) या समूहाची प्रमुख कंपनी, सध्या नागरी विमान वाहतूक ते डेटा केंद्रांपर्यंतच्या व्यवसायांमध्ये गुंतलेली आहे.
कोणाची किती भागीदारी
प्रवर्तकांकडे सध्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे 72.63 टक्के शेअर्स आहेत. याशिवाय 27.37 टक्के हिस्सा सुमारे 20 टक्के विमा कंपन्या आणि परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडे आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे शेअर्स गेल्या एका वर्षात दुपटीहून अधिक वाढले असून, त्याचे बाजार भांडवल 4.46 लाख कोटी रुपये झाले आहे.
किती मोठा व्यवसाय आहे
तुम्हाला सांगू इच्छितोत की, अदानी ग्रुपची कंपनी अदानी एंटरप्रायजेसच्या शेअरची किंमत 3903.35 रुपये होती. मागील दिवसाच्या तुलनेत स्टॉकमध्ये 0.48% ने घट झाली आहे. अदानी समूहाचा व्यवसाय बंदरे, ऊर्जा ते सिमेंट उद्योगापर्यंत पसरलेला आहे. सध्या अदानींच्या शेअर्सना खूप मागणी आहे.