Lokmat Money >गुंतवणूक > Gautam Adani Vs Hindenburg: अदानी समूहाशी टक्कर घेतल्यानंतर हिंडनबर्ग आणि नेथन अँडरसनच्या लोकप्रियतेत वाढ

Gautam Adani Vs Hindenburg: अदानी समूहाशी टक्कर घेतल्यानंतर हिंडनबर्ग आणि नेथन अँडरसनच्या लोकप्रियतेत वाढ

Gautam Adani Vs Hindenburg: अदानी समूहावर रिपोर्ट सादर केल्यानंतर Hinenburg चा फाउंडर नेथन अँडरसन याची जगभरात लोकप्रियता वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 02:42 PM2023-02-15T14:42:30+5:302023-02-15T14:42:59+5:30

Gautam Adani Vs Hindenburg: अदानी समूहावर रिपोर्ट सादर केल्यानंतर Hinenburg चा फाउंडर नेथन अँडरसन याची जगभरात लोकप्रियता वाढली आहे.

Gautam Adani Vs Hindenburg: Hindenburg and Nathan Anderson rise in popularity after clash with Adani Group | Gautam Adani Vs Hindenburg: अदानी समूहाशी टक्कर घेतल्यानंतर हिंडनबर्ग आणि नेथन अँडरसनच्या लोकप्रियतेत वाढ

Gautam Adani Vs Hindenburg: अदानी समूहाशी टक्कर घेतल्यानंतर हिंडनबर्ग आणि नेथन अँडरसनच्या लोकप्रियतेत वाढ

Gautam Adani Vs Hindenburg: भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि हिंडेनबर्ग...ही दोन नावे सध्या चर्चेत आहेत. 24 जानेवारी 2023 रोजी अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहावर गंभीर आरोप करणारी रिपोर्ट प्रकाशित केली, त्यानंतर अदानींचे साम्राज्य हादरले आणि गौतम अदानी यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा तोटा सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, या शॉर्ट सेलर कंपनीची आणि कंपनीचे संस्थापक नेथन अँडरसन यांची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढली.

हिंडेनबर्गच्या लोकप्रियतेत जोरदार वाढ
अदानी समूहावर प्रसिद्ध झालेल्या अहवालाने हिंडेनबर्ग रिसर्च आणि कंपनीच्या संस्थापक नेथन अँडरसरन यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडिया अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म सोशल ब्लेडच्या डेटावरुन असे दिसून आले आहे की, अदानी समूहावरील संशोधन अहवाल प्रकाशित झाल्यापासून हिंडनबर्ग रिसर्चच्या फॉलोअर्सची संख्या गेल्या एका महिन्यात सुमारे 2.5 लाखांनी वाढली आहे. या वाढीनंतर त्यांचे एकूण फॉलोअर्स 4.5 लाखांच्या पुढे गेले आहेत.

ट्विटर फॉलोअर्समध्ये 17000 ने वाढ 
गौतम अदानी यांचे नाव जोडल्याने कंपनीवरच परिणाम झाला नाही तर त्याचे संस्थापक नेथन अँडरसन ट्विटरसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील प्रसिद्ध होत आहेत. आकडेवारी पाहता, नेथन अँडरसनच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या एका महिन्यात 17,000 ने वाढली आहे. अँडरसनचे ट्विटर हँडल @ClarityToast आहे, ज्याला गौतम अदानीवरील अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अधिक लोकांनी फॉलो केले आहे. ताज्या वाढीनंतर अँडरसनच्या फॉलोअर्सची संख्या सुमारे 44,000 झाली आहे. रिसर्च फर्म हिंडेनबर्ग जुलै 2017 मध्ये ट्विटरवर आली, परंतु फॉलोअरच्या बाबतीत ते खूपच मागे होते. 

16 कंपन्यांचा अहवाल जारी करण्यात आला 
शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने निकोला, विन्स फायनान्स, चायना मेटल रिसोर्सेस युटिलायझेशन, एससी वर्क्स, प्रेडिक्टिव टेक्नॉलॉजी ग्रुप, स्माइलडायरेक्टक्लब आणि यांगत्से रिव्हर पोर्ट आणि लॉजिस्टिक्ससह सुमारे 16 कंपन्यांवर आपला संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात अदानी समूहाचाही समावेश आहे. पण सर्वाधिक लोकप्रिय ठरला तो अदानी समूहावर प्रसिद्ध झालेला हिंडेनबर्ग अहवाल. अदानी साम्राज्यावर हिंडेनबर्ग अहवालाचा मोठा परिणाम झाला आणि अदानी समूहाचे मार्केट कॅप $ 117 बिलियनवरुन $ 52.6 बिलियनवर आले आहे.

Web Title: Gautam Adani Vs Hindenburg: Hindenburg and Nathan Anderson rise in popularity after clash with Adani Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.