Join us  

गौतम अदानी देशातील 'या' क्षेत्रात क्रांती घडवणार; 8.35 लाख कोटी रुपये गुंतवणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 5:55 PM

अदानी ग्रुप दीर्घकाळापासून या क्षेत्रात काम करत आहे.

Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी यांनी फार वर्षांपूर्वी देशातील बंदरात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून बंदर क्षेत्राचे रुप पालटले आहे. आज अदानी ग्रुपची अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, ही केवळ देशातील नाही, तर जगातील सर्वात मोठ्या बंदर कंपन्यांपैकी एक बनली आहे. आता अदानी समूह पुन्हा एकदा देशातील एक क्षेत्र पूर्णपणे बदलण्यास सज्ज झाले आहे. यासाठी ते सुमारे 8.35 लाख कोटी रुपये (एकूण 100 अब्ज डॉलर्स) गुंतवणूक करणार आहे.

अदानी ग्रुप दीर्घकाळापासून ग्रीन एनर्जी क्षेत्रात काम करत आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, ही ग्रुपची कंपनी गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहे. आता देशातील ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्यासाठी अदानी ग्रुप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

अदानींची 100 अब्ज डॉलरची योजनाअदानी ग्रुप देशातील ऊर्जा प्रकल्पांवर काम करेल आणि त्याच्याशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन वाढवेल. अदानी ग्रुप यासाठी सुमारे 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी बुधवारी सांगितले की, ग्रीन एनर्जी निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रमुख घटकांची निर्मिती करणे हे त्यांच्या कंपनीचे उद्दिष्ट आहे. अदानी ग्रुप सूर्यप्रकाशापासून वीज निर्मितीसाठी सोलर फार्म आणि वाऱ्यापासून ऊर्जा निर्माण करण्यासाठी विंड फार्म विकसित करत आहे. याशिवाय, कंपनी ग्रीन हायड्रोजन, पवन ऊर्जा टर्बाइन आणि सौर पॅनेल बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोलायझर्सचे उत्पादन युनिट उभारत आहे.

स्वस्त ग्रीन इलेक्ट्रॉन बनवणाररेटिंग एजन्सी क्रिसिलच्या वार्षिक इन्फ्रास्ट्रक्चर समिट-2024 कार्यक्रमात गौतम अदानी बोलत होते. गौतम अदानी म्हणाले की, आगामी काळात ऊर्जा क्षेत्र आणि डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रात बदल करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सच्या संधी उपलब्ध आहेत. यामुळे स्थानिक आणि जागतिक पातळीवर भारत बदलेल. त्यांचा समूह पुढील दशकात ऊर्जा बदलासाठी 100 अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक करणार आहे. जगातील सर्वात स्वस्त ग्रीन इलेक्ट्रॉन बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे गौतम अदानी यांनी सांगितले. 

टॅग्स :गौतम अदानीव्यवसायगुंतवणूक