Lokmat Money >गुंतवणूक > सिंमेंट उद्योगात गौतम अदानींचे वर्चस्व वाढणार; 'या' कंपनीसोबत मोठा करार...

सिंमेंट उद्योगात गौतम अदानींचे वर्चस्व वाढणार; 'या' कंपनीसोबत मोठा करार...

अदानी समूहाने सिमेंट क्षेत्रात आपला दबदबा वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 07:30 PM2023-08-02T19:30:08+5:302023-08-02T19:30:49+5:30

अदानी समूहाने सिमेंट क्षेत्रात आपला दबदबा वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.

Gautam Adani's Ambuja Cements to buy majority stake in Sanghi Industries know details | सिंमेंट उद्योगात गौतम अदानींचे वर्चस्व वाढणार; 'या' कंपनीसोबत मोठा करार...

सिंमेंट उद्योगात गौतम अदानींचे वर्चस्व वाढणार; 'या' कंपनीसोबत मोठा करार...

Adani Business Plan: उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूह सिमेंट क्षेत्रात आपला दबदबा वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहे. अदानी समूहाची कंपनी अंबुजा सिमेंट, संघी इंडस्ट्रीजमध्ये मोठा हिस्सा विकत घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच याची घोषणा होईल. मात्र, सांघी इंडस्ट्रीजमध्ये, अंबुजा सिमेंट किती टक्के हिस्सा खरेदी करणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक
अल्ट्राटेक सिमेंटनंतर अदानी समूह हा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक आहे. अदानी समूहाची सिमेंट उत्पादनाची क्षमता 65 मिलियन टनांपेक्षा जास्त आहे. त्यांचे संपूर्ण भारतात डझनहून अधिक उत्पादन कारखाने आहेत. दुसरीकडे, संघी इंडस्ट्रीजची उत्पादन क्षमता प्रति वर्ष 6.1 मिलियन टन आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सांघी इंडस्ट्रीजचे मूल्य 6,000 कोटी रुपये किंवा $729 मिलियन ठरवून हा करार होत आहे.

कंपनीचा नफा वाढला
अंबुजा सिमेंटने बुधवारी जून तिमाही निकाल जाहीर केला. कंपनीने सांगितले आहे की, जून तिमाहीत त्यांचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 31.21 टक्क्यांनी वाढून 1,135 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 865 कोटी रुपये होता. कंपनीने सांगितले की, या तिमाहीत निव्वळ महसूल वार्षिक आधारावर 8.46 टक्क्यांनी वाढून 8,713 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत 8,033 कोटी रुपये होता.

संघी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ
संघी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ दिसून येत आहे. संघी इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी आज सकाळच्या व्यवहारात 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. बुधवारी सकाळी 11 वाजता संघी इंडस्ट्रीजचा शेअर 4.97 टक्क्यांनी किंवा 4.75 रुपयांनी वाढून 100.40 रुपयांवर व्यवहार करत होते.

Web Title: Gautam Adani's Ambuja Cements to buy majority stake in Sanghi Industries know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.