Lokmat Money >गुंतवणूक > रॉकेट स्पीडनं वाढेल PPF रिटर्न, ₹५००० चे बनतील ₹२६.६३ लाख; केवळ 'ही' गोष्ट ठेवा लक्षात

रॉकेट स्पीडनं वाढेल PPF रिटर्न, ₹५००० चे बनतील ₹२६.६३ लाख; केवळ 'ही' गोष्ट ठेवा लक्षात

कोणतीही जोखीम नसलेली गुंतवणूक हवी असेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF मध्ये गुंतवणूक सर्वोत्तम ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 02:42 PM2023-12-27T14:42:04+5:302023-12-27T14:43:04+5:30

कोणतीही जोखीम नसलेली गुंतवणूक हवी असेल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF मध्ये गुंतवणूक सर्वोत्तम ठरू शकते.

get huge returns on ppf investment 5000 rs investment will become rs 26 63 lakh investment tips details | रॉकेट स्पीडनं वाढेल PPF रिटर्न, ₹५००० चे बनतील ₹२६.६३ लाख; केवळ 'ही' गोष्ट ठेवा लक्षात

रॉकेट स्पीडनं वाढेल PPF रिटर्न, ₹५००० चे बनतील ₹२६.६३ लाख; केवळ 'ही' गोष्ट ठेवा लक्षात

जर तुम्हाला गुंतवणूक सुरू करायची असेल किंवा व्याजातून चांगलं उत्पन्न मिळवण्याचा मार्ग शोधत असाल किंवा कोणतीही जोखीम नसलेली गुंतवणूक हवी असेल, अशा परिस्थितीत, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF सर्वोत्तम ठरू शकते. भारतातील कोणताही नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यामध्ये उपलब्ध असलेले फायदे सर्वाधिक पसंतीचे आहेत. 

बँका आणि पोस्ट ऑफिस स्वतः पीपीएफमध्ये गुंतवणुकीचे फायदे समजावून सांगतात. चांगले व्याज, करमुक्त गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळणारे पैसे पूर्णपणे तुमचे असतात. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हे एक उत्तम साधन आहे. याचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे आहे. परंतु, १५ वर्षांनंतरही गुंतवणूक वाढवता येते. तुम्ही कालावधी वाढवल्यास तुमचा परतावा रॉकेटच्या स्पीडनं वाढेल आणि ५००० रुपयांची सुरुवातीची गुंतवणूक २६ लाख रुपयांपेक्षा जास्त केव्हा होईल ते तुम्ही पाहत राहाल.

मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला ३ पर्याय मिळतात. हे ३ पर्याय समजून घेणं खूप महत्वाचं आहे. प्रथम, मुदतपूर्तीनंतर तुमचे पैसे काढा. दुसरे म्हणजे, तुम्ही पैसे काढले नाही तरी व्याज चालूच राहील. तिसरा पर्याय म्हणजे नवीन गुंतवणुकीसह, ५ वर्षांसाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते. यासाठी काय आणि कसं करावं लागेल हे पाहू. पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटीनंतर तुमच्याकडे तीन पर्याय असतात.

मॅच्युरिटीवर पैसे काढणं
पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटीवर, तुम्ही त्यात जमा केलेली रक्कम आणि त्यावर मिळणारं व्याज काढू शकता. हा पहिला पर्याय आहे. खातं बंद झाल्याच्या स्थितीत तुमचे संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. विशेष बाब म्हणजे मॅच्युरिटीवर मिळणारे पैसे आणि व्याज पूर्णपणे करमुक्त असेल. तसंच, तुम्ही किती वर्षे गुंतवणूक केली आहे यावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.

१५ वर्षांनंतरही सुरू ठेवू शकता
दुसरा फायदा किंवा पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या खात्याचा कालावधी मॅच्युरिटीनंतर वाढवू शकता. यामध्ये तुम्हाला ५-५ वर्षांच्या कालावधीसाठी वाढ करता येईल. परंतु, हे लक्षात ठेवा की तुम्हाला पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटीच्या १ वर्ष आधी मुदतवाढीसाठी अर्ज करावा लागेल. मात्र, मुदतवाढीदरम्यान तुम्ही पैसे काढू शकता. यामध्ये प्री-मॅच्युअर पैसे काढण्याचे नियम लागू होत नाहीत.

विना गुंतवणूक अकाऊंट सुरू राहणार
PPF खात्याचा तिसरा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्ही वरील दोन पर्याय निवडले नसले तरी, तुमचं खातं मॅच्युरिटीनंतरही चालू राहील. यामध्ये तुम्ही गुंतवणूक केलीच पाहिजे असंही नाही. मॅच्युरिटी कालावधी आपोआप ५ वर्षांनी वाढेल. चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यात व्याज मिळत राहील. येथे ५-५ वर्षांची मुदतवाढ देखील लागू होऊ शकते.

५००० चे कसे बनतील २६.६३ लाख
सध्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये ७.१ टक्के व्याज दिलं जात आहे. जर तुम्ही या व्याजदरासह १५ किंवा २० वर्ष गुंतवणूक केली तर तुम्ही खूप मोठा फंड तयार करू शकता.

जर तुम्ही महिन्याला १ हजार रुपये गुंतवत असाल तर तुम्हाला १५ वर्षांनंतर ३.२५ लाख आणि २० वर्षांनंतर ५.३२ लाख रुपये मिळतील. जर तुम्ही महिन्याला २ हजार गुंतवले तर तुम्हाला १५ वर्षांनंतर ६.५० लाख, २० वर्षांनंतर १०.६५ लाख, तसंच महिन्याला ३ हजार गुंतवल्यास १५ आणि २० वर्षाला अनुक्रमे ९.७६ लाख रुपये आणि १५.९७ लाख रुपयांचा निधी, तर महिन्याला ५ हजार रुपये गुंतवल्या १५ वर्षांनी १६.२७ लाख आणि २० वर्षांनी २६.६३ लाख रुपयांचा निधी मिळेल. ही रक्कम अंदाज म्हणून दिली आहे. पीपीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात दर ३ महिन्यांनी बदल होत असतात. या रकमेमध्येही बदल होऊ शकतो.

Web Title: get huge returns on ppf investment 5000 rs investment will become rs 26 63 lakh investment tips details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.